शिवाजी विद्यापीठाच्या हिंदी अभ्यास मंडळावर पदव्युत्तर शिक्षक म्हणून डॉ. नितीन धवडे यांची नियुक्ती

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य | दि. २० फेब्रुवारी २०२३ | फलटण |
महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम २०१६ कलम ४० (२)(ब)(२) च्या तरतुदीनुसार मुधोजी महाविद्यालयातील हिंदी विभाग प्रमुख प्रोफेसर डॉ. नितीन धवडे यांची शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर मानव्यविद्या शाखेअंतर्गत पदव्युत्तर शिक्षक म्हणून हिंदी अभ्यास मंडळावर मा. कुलगुरूंच्या वतीने नामनिर्देशित सदस्य म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

डॉ. धवडे हे गेली वीस वर्षे मुधोजी महाविद्यालयात हिंदी विषयाचे अध्यापक व विभाग प्रमुख म्हणून कार्यरत आहेत. अनेक राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय चर्चासत्रांमध्ये संसाधन व्यक्ती म्हणून त्यांनी मार्गदर्शन केले असून अनेक चर्चासत्रांमध्ये विविध विषयांवर त्यांनी शोधनिबंध सादर केले आहेत. राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरील जर्नल्स मध्ये त्यांचे वीस शोधनिबंध प्रकाशित झाले आहेत. तसेच शिवाजी विद्यापीठ हिंदी प्राध्यापक परिषदेचे कार्यकारणी सदस्य म्हणूनही ते सध्या काम पाहत आहेत.

या नियुक्तीबद्दल फलटण एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष तथा विधान परिषदेचे माजी सभापती आमदार श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर, फलटण एज्युकेशन सोसायटीच्या गव्हर्निंग कौन्सिलचे चेअरमन श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर, फलटण एज्युकेशन सोसायटीचे सचिव तथा जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांनी डॉ. नितीन धवडे यांचे विशेष अभिनंदन केले आहे. तसेच फलटण एज्युकेशन सोसायटीचे गव्हर्निंग कौन्सिलचे उपाध्यक्ष व सर्व सदस्य, प्रशासन अधिकारी यांनीही या नियुक्तीबद्दल त्यांचे अभिनंदन केले. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. पी. एच. कदम, सर्व शिक्षक- शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थ्यांनीही डॉ. धवडे यांचे अभिनंदन करून त्यांना पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

यावेळी डॉ. नितीन धवडे यांचे अभिनंदन व सत्कार संस्थेचे सचिव श्रीमंत संजीवराजे, समवेत महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. पी. एच. कदम, उपप्राचार्य डॉ. एस. जी. दीक्षित, महाविद्यालय विकास समितीचे सदस्य डॉ. ए. एन. शिंदे यांनी केला.


Back to top button
Don`t copy text!