डॉ. संतोष दशरथ चांगण यांची पशूधन विकास अधिकारी गट अ या पदावर नियुक्ती

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य । दि. ११ मे २०२२ । दुधेबावी । येथील डॉ. संतोष दशरथ चांगण यांची महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत पशूधन विकास अधिकारी गट अ या पदावर जत, जि. सांगली येथे नियुक्ती झाली आहे. या नियुक्तीबद्दल विविध स्तरावरुन त्यांचे अभिनंदन होत आहे.

डॉ. चांगण यांचे प्रा. व माध्यमिक शिक्षण फलटण महाविद्यालयीन शिक्षण नागपूर पशूवैद्यक महाविद्यालय येथे झाले असून पदव्युत्तर शिक्षण पशू पोषणशास्त्र या पशू संवर्धनशी निगडित महत्वाच्या विषयामध्ये झाले आहे.

डॉ. चांगण यांनी नामांकित खाजगी व सहकारी संस्था मध्ये पशू आहार तज्ञ म्हणून काम केले आहे. २०१९ साली महाराष्ट्र लोकसेवा आयोगमार्फत पशूधन विकास अधिकारी गट अ या पदासाठी लेखी व मुलाखत चाचणी देऊन महाराष्ट्र राज्यामध्ये मुलाखतीमध्ये मध्ये प्रथम क्रमांक मिळवून संपूर्ण राज्यामध्ये ११७ वा क्रमांकाने घवघवीत यश संपादन केले आहे. निवड झाल्याबद्दल उपमुख्यमंत्री अजित पवार, खा. सुप्रियाताई सुळे, गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या हस्ते सातारा येथे कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या पुण्यतिथीनिमित्त आयोजित कार्यक्रमात त्यांचा सत्कार करण्यात आला.


Back to top button
Don`t copy text!