डॉ. आंबेडकर जयंती मंडळाकडून इफ्तारचे आयोजन

दलित मुस्लिम ऐक्याचे फलटणला अनोखे दर्शन

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य । 2 एप्रिल 2025। फलटण । येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती महोत्सव समितीच्यावतीने रमजान ईद निमित्त इफ्तारचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी विजय येवले, जिल्हा सरचिटणीस आरपीआय, मुन्ना शेख, बापूसाहेब जगताप, सचिन अहिवळे माजी नगरसेवक, हाजी नियाजहम्मद कुरेशी, हाजी शुकुर कसम कुरेशी, हाजी जाकीर आदम कुरेशी, जमील महबूब कुरेशी, अलीम रफिक कुरेशी, शकील कुरेशी, तालीफ अस्लम कुरेशी, इमरान नियाज अहमद कुरेशी, मुक्तार नियाज अहमद कुरेशी, मुकेश अहिवळे स्वच्छता निरीक्षक कराड महानरपालिका,डॉ. वर्धमान अहिवळे प्राचार्य लॉ. कॉलेज मालेगाव, पत्रकार सचिन मोरे, अनिल पिसाळ आदी मान्यवर उपस्थित होते.

रमजान महिन्यात मुस्लिम बांधव उपवास करतात. उपवास सोडण्यासाठी रोजा इफ्तारचे आयोजन केले जाते. या महिन्यातील अखेरचे पाच ते सहा दिवस रात्रभर जागून प्रार्थना केली जाते. रात्रभर जागल्यानंतरही मुस्लिम बांधव या इफ्तार पार्टीला उपस्थित होते.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती मंडळाच्यावतीने इफ्तारचे आयोजन शहरात प्रथमच करण्यात आले होते. यामध्ये शहरातील अनेक मुस्लिम बांधव सहभागी झाले होते.

या उपक्रमाबद्दल मंडळाचे त्यांनी कौतुक केले. यावेळी डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती मंडळाच्यावतीने मुस्लिम बांधवांना महापुरुषांच्या पुस्तकांची भेट देण्यात आली. यावेळी विविध मान्यवरांनी आपले विचार व्यक्त केले.

यावेळी गणेश अहिवळे, अजय काकडे, गोविंद काकडे, सुरज काकडे, भूषण बनसोडे, सिद्धार्थ अहिवळे, चंद्रकांत मोहिते, मंगेश सावंत, कपिल काकडे आदी मान्यवर उपस्थित होते.


Back to top button
Don`t copy text!