
दैनिक स्थैर्य । 17 एप्रिल 2025। फलटण । डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची 134 वी जयंती श्रीमंत शिवाजीराजे उद्यानविद्या महाविद्यालय व कृषी महाविद्यालयात उत्साहात साजरी झाली.
प्राचार्य डॉ. एस. डी. निंबाळकर आणि प्राचार्य डॉ. यु. डी. चव्हाण यांनी डॉ. आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून पुष्पहार अर्पण केले.
प्राचार्य एस. डी. निंबाळकर म्हणाले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी देशाची राज्यघटना तयार करताना मोलाचे कार्य केले. त्यांचे विचार आजच्या काळात सर्वांनी अंमलात आणणे गरजेचे आहे.
यावेळी प्रा. एस.पी. तरटे, प्रा. ए. आर. फडतरे, डॉ. जी.बी. अडसूळ, डॉ. ए. एस. अभंगराव तसेच विद्यार्थ्यांनी आपले मनोगत व्यक्त केले.
कार्यक्रमासाठी दोन्ही महाविद्यालयाचे प्राध्यापक, कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन प्राध्यापक ए. आर. फडतरे यांनी केले व आभार प्रदर्शन प्राध्यापक पी. व्ही. भोसले यांनी केले.