डॉ. बाबासाहेब आंबेडकर रिक्षा संघटनेच्या वतीने अजय मिसाळ यांचा सत्कार


दैनिक स्थैर्य | दि. ७ जुलै २०२३ | फलटण |
डॉ. बाबासाहेब आंबेडकर रिक्षा संघटनेच्या वतीने पी.एस.आय.च्या परीक्षेत उत्तीर्ण झाल्याबद्दल श्री. अजय मिसाळ यांचा सत्कार करण्यात आला.

या निवडीबद्दल डॉ. बाबासाहेब आंबेडकर रिक्षा संघटनेचे अध्यक्ष श्री. दिनेश अहिवळे यांच्या हस्ते त्यांचा विशेष सत्कार करण्यात येऊन उपस्थित सर्वांना जिलेबीचे वाटप करण्यात आले. अत्यंत कठीण परिश्रमातून हे यश मिळवल्याबद्दल श्री. अजय मिसाळ यांचे कौतुक होत आहे.

याप्रसंगी संघटनेचे उपाध्यक्ष श्री. सनी कदम तसेच माजी अध्यक्ष श्री. शरद अहिवळे, सचिव श्री. रत्नेश्वर निकाळजे, माजी अध्यक्ष श्री. दादासाहेब अहिवळे, श्री. उदय काकडे, श्री. देवा चव्हाण, श्री. किशोर अहिवळे, श्री. संजय मोरे, श्री. सुरेश कोलवडकर, श्री. राजेन्द्र माने, श्री. आर्या काकडे, श्री. प्रेम काकडे, श्री. अनिल मिसाळ, श्री. अमोल मोरे व डॉ. बाबासाहेब आंबेडकर रिक्षा संघटनेचे सर्व सभासद उपस्थित होते.


Back to top button
Don`t copy text!