
स्थैर्य, फलटण, दि. ०९ सप्टेंबर : फलटण येथील ‘अपना बझार’चे संचालक दोशी परिवाराने, आपली कन्या कु. धानी नरेश दोशी हिचा पहिला वाढदिवस एका अभिनव आणि सामाजिक बांधिलकी जपणाऱ्या उपक्रमाने साजरा केला. यानिमित्ताने श्री क्षेत्र बाहुबली (कुंभोज) येथील गुरुकुलमधील सुमारे ३०० गरजू मुलांना अन्नदान करण्यात आले.
यावेळी दोशी परिवारातर्फे गुरुकुलमधील सर्व मुलांना सकाळचा नाश्ता आणि मिठाई देण्यात आली. यासोबतच, संस्थेसाठी ३० किलो गहू, ३० किलो पोहे आणि ३० किलो साखर अशा अन्नधान्याच्या स्वरूपातही मदत करण्यात आली. दोशी परिवाराच्या या कृतीचे सर्वत्र कौतुक होत आहे.
श्री क्षेत्र बाहुबली येथील गुरुकुलमध्ये समाजातील गरजू विद्यार्थ्यांना मोफत शिक्षण आणि निवासाची सोय केली जाते. अशा संस्थेला मदत करून दोशी परिवाराने वाढदिवस साजरा करण्याचा एक नवा आदर्श समाजासमोर ठेवला आहे.