दैनिक स्थैर्य । दि.०४ जानेवारी २०२२ । सातारा । प्राथमिक आरोग्य केंद्र रहिमतपुर येथील कर्मचारी यांच्यामार्फत 15 ते 18 वर्षे वयोगटातील एकूण 775 विद्यार्थ्यांना कोव्हॅक्सिन या लसीचे डोस देण्यात आले. दि. 3 जानेवारी 2022 पासून राविण्यात येणाऱ्या या मोहिमेमध्ये शाळा व शाळाबाह्य 15 ते 18 वर्षे वयोगटातील मुले-मुली यांना कोविड-19 लस देण्यात येणार आहे.
यावेळी कोविड-19 या आजारावर नियंत्रण व निर्मूलन करण्यासाठी लसीकरणाविषयी माहिती देण्यात आली. तसेच पालकांमधील लसीकरणाबाबतच्या शंकांचे निरसन करण्यात आले. सर्व पालक वर्ग यांनी आपल्या 15-18 वर्षे वयोगटातील मुलांच्या लसीकरणास सहकार्य करण्याचे आवाहनही यावेळी करण्यात आले. लसीकरण दर सोमवारी व शुक्रवारी प्राथमिक आरोग्य केंद्र स्तरावर आयोजित करण्यात येईल.