स्थैर्य, फलटण, दि. 24 : सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांमधील ओबीसी समाजाचे राजकीय आरक्षण संपुष्टात आले असले तरी ओबीसी बांधवांनी काळजी करु नये; ना.श्रीमंत रामराजेंच्या मनात तुमचे स्थान अढळ आहे. तुमच्यावर कोणत्याही प्रकारचा अन्याय होणार नाही, असे आवाहन फलटण कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर यांनी सोशल मिडीया पोस्टद्वारे केले आहे.
4 मार्च रोजी सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयानुसार ओबीसींना 50 टक्क्यांहून अधिक आरक्षण देता येणार नाही, असा निकाल दिला होता. त्यानंतर या निर्णयाबद्दल पुर्नविचार व्हावा अशी याचिका राज्य सरकारकडून करण्यात आली होती. मात्र, सर्वोच्च न्यायालयाने आपला निर्णय कायम ठेवत राज्य सरकारची याचिका फेटाळून लावली आहे. त्यामुळे ओबीसी समाजाला मोठा धक्का मानला जात आहे. त्याअनुषंगाने श्रीमंत रघुनाथराजे यांनी या पोस्टद्वारे कार्यकर्त्यांना आश्वस्त केले आहे.
स्थानिक स्वराज्य संस्थेतील ओबीसी आरक्षण सर्वोच्च न्यायालयाने अखेर रद्द केले आहे. ठाकरे सरकारची पुनर्विचार याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळून लावली आहे. या निर्णयामुळे आता ग्रामपंचायत, जिल्हापरिषद आणि स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये ओबीसींना मिळणार राजकीय आरक्षण संपुष्टात आले आहे, असा निर्णय सुप्रीम कोर्टाने घेतला असला तरी फलटण तालुक्यातील ओबीसी बांधवानी घाबरून जायचे कारण नाही. विधानपरिषदेचे सभापती ना. श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांच्या ह्रुदयात तुमचे स्थान अढळ आहे व अढळच राहणार आहे. फलटण तालुक्यातील ओबीसी बांधवानी घाबरून जाण्याची गरज नाही. फलटण तालुक्यातील ओबीसी बांधवाना श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर हे अन्याय होवू देणार नाहीत, असा संदेश श्रीमंत रघुनाथराजे यांनी या पोस्टद्वारे दिला आहे.