नगर परिषदेच्या प्रशासनाचे खच्चीकरण करू नका

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


स्थैर्य, सातारा, दि. 09 : सातारा नगरपरिषदेचे उपमुख्याधिकारी संचित धुमाळ यांना लाच घेताना अ‍ॅन्टी करप्शन ब्युरोने रंगेहाथ पकडले आहे. नगरपरिषद संचालनालयाकडून थेट नियुक्ती झालेल्या या संचित धुमाळांबाबत कायदा आपले काम करेलच किंबहुना कायदयाच्या आधारे त्यांच्यावर कठोर कारवाई झालीच पाहीजे, “पण एक आंबा नासका निघाला म्हणून आपण सर्वच आंबे फेकून देत नाही म्हणूनच एकाच्या कुकर्माचा न्याय , अन्य अधिकारी कर्मचा-यांना लावून, सर्व जण एका माळेचे मणी असे समजुन चालणार नाही, अश्याप्रकारच्या  समजुतीने, नगरपरिषदेच्या प्रशासनाचे खच्चीकरण होवून, त्याचा विपरित परिणाम नागरी सुविधांवर होणार नाही याची काळजी आपण सर्वानीच घेतली पाहीजे अशी प्रतिक्रीया सातारा नगरपरिषदेच्या नगराध्यक्षा सौ.माधवी कदम  यांनी एका प्रसिध्दीपत्रकाव्दारे दिली आहे.

सातारा विकास आघाडीच्या सत्तेच्या काळात आमचे नेते खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांच्या नेतत्वाखाली गेल्या 8-10 वर्षात ग्रेडसेपरेटर, कास धरण उंची, नवीन कास पाईपलाईन, भुयारी गटर योजना, घरकुल योजना, घनकचरा व्यवस्थापन, आयडीएसएमटी, युआयडीएसएसएमटी,  असे  कोटयावधी रुपयांचे मोठे प्रकल्प नागरीकांचे हित लक्षात घेवून, मार्गी लावण्यात आले आहेत, शहरातील गल्ली बोळात, विद्युतीकरण, कॉक्रीटरोड, गटर्स, रस्ते आदी दैनंदिन विकास कामे तर गरजेनुसार प्राधान्याने हाताळणेत आलेली आहेत. सातारा विकास आघाडीच्या काळात झालेली कामे त्या पूर्वी कधी झालेली नाहीत ही वस्तुस्थिती आहे  असे नमुद करुन, नगराध्यक्षा सौ. कदम यांनी दिलेल्या प्रसिध्दीपत्रकात पुढे नमुद केले आहे की, नगरपरिषद संचालनालयाकडून थेट नियुक्ती झालेल्या अधिकाऱ्यांना त्यांचे गाव सोडून नियुक्त्या मिळाल्याने, त्याना सामाजिक बांधीलकी, शहराविषयी असणारी आत्मियता जितकी पाहीजे तितकी असत नाही.त्यामुळेच संचित धुमाळांसारखा एखादा अधिकारी, मनाची आणि जनांची सोडून वागल्यावर असे परिणाम दिसु शकतात. अश्या एखादुस-या  अधिकार्यामुळे  नगरपरिषदेच्या प्रशासनामधील सर्वच  आधिकारी -कर्मचारी भ्रष्ट आणि लाचखोर आहेत असा समज करुन घेतल्यास, प्रशासनाचे खच्चीकरण केल्यासारखे होणार आहे. जे कोणी दोषी असतील त्यांना शिक्षा ही झालीच पाहीजे परंतु कोणाही निष्पाप व्यक्तीवर अन्याय सुध्दा होणार नाही याचीही खबरदारी घेतली गेली पाहीजे.

त्याचप्रमाणे या एका प्रकारामुळे आता काही व्यक्ती त्याचे भांडवल करुन, आपापले अकलेचे तारे तोडणार हे साहजिक आहे. नगरपरिषेदवर कोणाचा वचक राहीला नाही, अशी घटना पूर्वी कधी घडली नाही, कलंक लागला, नेत्यांनी अजुनही सावध व्हावे वगैरे वगैरे टिका-टिपणी काही व्यक्ती या संधीचा लाभ उठवण्याच्या हेतुने करणार हे निश्‍चित आहे, काल जे काही  घडले ते अक्षम्य आहे.  तथापि यापूर्वीही अश्या दोन घटना घडल्या आहेत.

जे स्वत जेष्ठ नगरसेवक असे संबोधित करतान ते नगरसेवक अशोक मोने यांनी त्यांच्या संपूर्ण कार्यकाळात  लोकहिताची वर नमुद विकास कामे यापूर्वी का केली नाहीत हा खरा सवाल उठतो. सातारा विकास आघाडी किंवा नेत्यांची प्रशासनावर पकड नसती तर इतक्या मोठया प्रमाणात विकास कामे मार्गी लागली नसती. या दुर्दैवी घटनेचा फायदा घेऊन , सत्तारुढ आघाडीवर टिका करणे सोपे आहे., त्यांच्या दिर्घ सत्तेच्या काळात लोकहिताची वर नमुद कामे त्यांना करता आली नाहीत, म्हणजे त्यांची प्रशासनावर पकड कधीही  नव्हती असेच त्यांना म्हणायचे आहे का असा प्रतिप्रश्‍न देखिल नगराध्यक्षा सौ.माधवी कदम यांनी उपस्थित केला. माजी जिल्हाप्रमुख नरेंद्र पाटील प्रामुख्याने लेखा,बांधकाम आरोग्य विभागासह  प्रत्येक विभागात जावून  अनाधिकाराने हस्तक्षेप करुन, अधिकारी-कर्मचा-यांच्या वेळेचा अपव्यय करीत असतात. असे करण्याऐवजी त्यांना जी काही माहीती पाहीजे ती मुख्याधिकारी यांचेकडे लेखी किंवा तोंडी मागावी, त्यांनाच नाही तर अन्य कोणालाही अशाप्रकारे  माहीती मुख्याधिकारी स्तरावरुन यथावकाश उपलब्ध करुन दिली जाईल. तसेच नरेंद्र पाटील यांनी ट्रॅप संदर्भात  मुलाखत देताना, तृतीयपंथीयांचा एक प्रकारे अपमान व उपमर्दच केला आहे. आज तृतीयपंथीही विविध क्षेत्रात कर्तबगार कामगिरी बजावत  आहेत. तृतीयपंथीयांनी प्रयत्नपूर्वक दाखवलेल्या कर्तबगारीला आणि त्यांनी निर्माण केलेल्या आत्मविश्‍वासाला हिन लेखून नरेंद्र पाटील यांनी मात्र तडा दिला आहे असा घणाघात देखील  सौ.माधवी कदम  यांनी चढवला आहे.

सौ. माधवी कदम, नगराध्यक्षा, सातारा नगरपरिषद,सातारा.


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Don`t copy text!