स्थैर्य, फलटण : हणमंतवाडी ता. फलटण येथील गावांमध्ये मोठ्या प्रमाणात दलित वस्ती व गावच्या विकासाची कामे सुरू आहेत संबंधित विरोधकांनी प्रसिद्धी मिळवण्यासाठी व दलित वस्तीच्या कामांना नेहमीच विरोध करण्यासाठी खोटी प्रसिद्धी मिळवण्याच्या अट्टाहास मिळवला आहे सातारा जिल्ह्यातील व सर्वात कमी लोकसंख्या असणाऱ्या गावात नेहमीच विकासकामांना व गती दिली असून असा कोणताही प्रकार होऊ देणार नाही. फलटण तालुक्यातील हणमंतवाडी येथे बौद्ध वस्तीतील गटाराचे बांधकाम पूर्ण झाले असून 26 जून रोजी सलग 4 तास मुसळधार पावसाने 20 मीटर गटार वाहून गेले होते. परंतु या घटनेबाबत गावातील विरोधी गटाने त्याला राजकीय वळण देत दलित वस्तीतील गटर वाहून गेल्याची माहिती दिली. प्रत्यक्ष गटार हे फक्त वीस मीटर वाहून गेले असल्याने त्या बौद्ध वस्तीतील गटाराचे काम पूर्ण झाले आहे. अशी माहिती हनुमंतवाडी गावचे सरपंच विक्रमसिंह जाधव यांनी दिली.
बौद्ध वस्तीत अल्पसंख्याक बहुल ग्रामीण क्षेत्रातील पायाभूत सुविधा विकास कार्यक्रमांतर्गत दहा लाख रुपयांचे काम मंजूर करण्यात आलेले होते. दिनांक 25 जूनच्या रात्री हणमंतवाडी गावात सलग चार तासांपेक्षा जास्त मुसळधार पाऊस पडल्याने अतिवेगवान पावसाच्या पाण्याने 20 मीटर गटाराचे बांधकाम वाहून गेले. त्यानंतर हणमंतवाडी ग्रामपंचायतीने याबाबतचा पंचनामा हणमंतवाडी गावचे तलाठी गायकवाड यांनी केला व हणमंतवाडी ग्रामपंचायतीच्या मासिक सभेत हे काम 25 जून 2020 रोजी नैसर्गिक आपत्ती त्यामुळे वाहून गेली असल्याचा ठराव ग्रामपंचायतीच्या मासिक मिटिंग मध्ये करण्यात आला.
संबंधित काम उत्कृष्ट व्हावे यासाठी आम्ही फलटणच्या प्रांताधिकार्यांना बुधवार दिनांक 15 जुलै रोजी निवेदन दिले होते. परंतु त्याच्या कामाची दखल आज गुरुवारी पूर्ण झाल्याने आम्ही त्या कामाबाबत समाधानी आहोत आमच्या समाजाच्या विकास कामासाठी आम्ही आमचा नेहमीच लढा सुरूच ठेवणार असल्याचे प्रतिपादन रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे आंबेडकर गटाचे तालुकाध्यक्ष संजय गायकवाड यांनी केले.