शिवसेनेच्या बोटाला धरुनच भाजप मोठा झाला हे विसरु नका – चंद्रकांत पाटलांना शंभूराज देसाईंचा टोला

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य । दि. १० डिसेंबर २०२१ । सातारा । भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटलांनी अडवाणी साहेबांना विचारावे. की हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे, शिवसेनाप्रमुख उद्धवसाहेब यांच्या बोटाला धरुनच भाजपा महाराष्ट्रात मोठी झाली आहे. नैराश्येतून वक्तव्य करणे टाळावे अन्यथा त्यांचा गावागावात शिवसैनिक समाचार घेतील, असा सुचक इशाराच राज्याचे गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी चंद्रकांत पाटील यांना पत्रकार परिषदेत लगावला. दरम्यान, बंगल्यात बिबटय़ा आल्याप्रकरणी छेडले असता ते म्हणाले, वाघ वाघालाच भेटायला येणार बच्छडय़ाला नाही, असा उपरोधीक टोलाही त्यांनी पारंपारिक विरोधकांना लगावला.

साताऱयातल्या शासकीय विश्रामगृहात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. ते म्हणाले, माझ्याच जिह्यात येवून भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील शिवसेनेवर टीका करत असतील तर ते मी कदापि खपवून घेणार नाही. कोणताही आधार नसताना वक्तव्य करणे चुकीचे आहे. भाजपाच्यावतीने अनेक तारखा महाविकास आघाडीचे सरकार पडण्याबाबत त्यांनी दिल्या. कधी दोन महिन्याच्या तर कधी दोन वर्षाच्या. पण मुख्यमंत्री उद्धवसाहेब हे आमचे नेतृत्व कणखर आणि अभ्यासू आहे. अनेक संकट आली त्या संकटात आली. त्या संकटाला आम्ही धिराने सामना केला. चंद्रकांत पाटील यांनी नैराश्येतून वक्तव्य करणे टाळावे, तुमच्या भाजपाचेही केवळ दोनच खासदार होते सुरुवातीला. इतर पक्षांची जवळीक त्यावेळी करुन सरकार केले होते हे विसरला काय?, आज प्रमोद महाजन नाहीत, गोपिनाथ मुंढे नाहीत त्यांनी भाजपासाठी मेहनत घेतली. लालकृष्ण अडवाणी साहेब आहेत त्यांना चंद्रकांत पाटलांनी विचारावे की हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे साहेब आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या बोटाला धरुनच महाराष्ट्रात गाव पातळीवर भाजपा पोहचली आहे. निवडणूकीवेळी युतीधर्म शिवसेनेने पाळला होता. त्यानंतर भाजपाने युती धर्म पाळला नाही हेही त्यांनी तपासावे, अशी टीप्पणी केली.
सरसकट कारवाई केली जाणार.

एसटी कर्मचाऱयांना 41 टक्के पगारवाढ दिली आहे. तरीही कर्मचारी कामावर येत नसतील तर त्यांच्यावर कारवाई केली जाणार आहे. तिथे एखादी संघटना म्हणून कारवाईमध्ये दुजाभाव केला जाणार नाही. एसटी कर्मचाऱयांनी आता कामावर यावे, लोकांना सेवा द्यावी, असे आवाहन शंभूराज देसाई यांनी केले आहे.

वाघ वाघालाच भेटायला येणार
बंगल्यात बिबटय़ा आल्याबाबत छेडले असता शंभूराज देसाई म्हणाले, वाघ वाघालाच भेटायला येणार बच्छडय़ाला नाही. सापडला असता तर शिवबंधनही बांधले असते असे मार्मिंक उत्तर देत आपल्या पारंपारिक विरोधकांनाही सुरु असलेल्या नगरपंचायतीच्या निवडणूकीच्या अनुषंगाने टीप्पणी केली. दरम्यान, पाटण नगरपंचायतीची निवडणूक ही शिवसेना ताकदीने लढवणार आहे. तसेच येवू घातलेल्या सर्वच निवडणूका या ताकदीने लढवण्यात येतील, शिवसेना कुठेही कमी पडणार नाही, असेही त्यांनी सांगितले.

रामराजेंच्या संपर्कावर विश्वास नाही
जिल्हा बँकेत स्वीकृत पदासाठी रामराजेंकडे संपर्क वैगेरे असे पत्रकारांनी छेडले असता ते म्हणाले, रामराजेंच्या संपर्कावर माझा विश्वास नाही. मला स्वीकृत संचालक म्हणून जायचे नाही, असेही त्यांनी सांगितले.

गुन्हेगारांवर कारवाई आमचे पोलीस करत आहेत
कितीही बडा गुन्हेगार असुद्यात. हे राज्य कायद्याचे राज्य आहे. आमचे पोलीस जो गुन्हा करतो त्याच्यावर कारवाई करत आहेत मग तो कितीही मोठा गुन्हेगार असू द्यात. त्याला सुट्टी नसते. तो कोणत्याही पक्षाचा असो, असेही मंत्री शंभूराज देसाई यांनी सांगितले.


Back to top button
Don`t copy text!