सर्वसामान्यांच्या पोटावर पाय देणारा लॉकडाऊन वाढवू नका; फलटण नगर परिषद विरोधी पक्षाची मागणी

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


स्थैर्य, फलटण : करोना विषाणूच्या आपत्तीमुळे गेले सुमारे चार महिने शहरात लॉक डाऊन सुरु आहे, प्रशासनाच्या नियमांना व्यापारी व नागरिकांनी सहकार्य केलेले आहे परंतू आता सर्वसामान्य जनतेला नियमीत रोजगाराशिवाय पर्याय नाही त्यामुळे दि.३१ जुलै नंतर  सर्वसामान्यांच्या पोटावर पाय देणारा लॉक डाऊन सातारा जिल्ह्यात  वाढवू नये अशा आशयाचे निवेदन फलटण नगर परिषदेतील विरोधी नगरसेवकांनी प्रांताधिकारी डॉ. शिवाजीराव जगताप यांना दिले आहे.

फलटण नगर परिषदेतील विरोधी गटाच्या सर्व नगरसेवकांनी प्रांताधिकारी  डॉ. शिवाजीराव जगताप यांना दिलेल्या निवेदनाद्वारे, प्रशासनाने आजपर्यंत घातलेल्या निर्बंधांना व्यापारी व जनतेने सहकार्य केलेले आहे परंतू आता सततच्या बंदमुळे रोजगारा अभावी अनेकांची उपासमार होऊ लागली असून करोनापेक्षा भूकबळी व आत्महत्या होण्याची भिती व्यक्त करण्यात आली आहे. यापुढे लॉक डाऊन वाढवू नये अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे.

या निवेदनावर विरोधी पक्षनेते समशेरसिंह नाईक निंबाळकर, नगरसेविका श्रीमती मंगलादेवी नाईक निंबाळकर, अमरसिंह नाईक निंबाळकर, अशोकराव जाधव, सचिन सुर्यवंशी बेडके डॉ. प्रविण आगवणे, सचिन अहिवळे, अनुप शहा, मीना नेवसे, सौ. मदलसा कुंभार, सौ. ज्योती खरात, जयकुमार शिंदे, बाळासाहेब कुंभार आदींच्या सह्या आहेत.

स्थैर्य, फलटण : प्रांताधिकारी डॉ. शिवाजीराव जगताप यांना निवेदन देताना अशोकराव जाधव, सचिन सुर्यवंशी बेडके, जयकुमार शिंदे, अनुप शहा, डॉ. प्रवीण आगवणे, सचिन अहिवळे वगैरे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Don`t copy text!