फलटणकरांनो घाबरू नका, प्रशासन तुमच्या सोबत : मुख्याधिकारी प्रसाद काटकर

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


 

स्थैर्य, फलटण, दि.१५: फलटण नगरपरिषद प्रशासनाच्या वतीने पुरग्रस्त भागात वास्तव्यास असणाऱ्या सर्व नागरिकांना शंकर मार्केट, फलटण येथील व्यंकटेश विद्यालय (फलटण नगरपरिषदेच्या रुग्णालया शेजारी) येथे सुरक्षित स्थळी प्रशासनाच्या वतीने राहण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. तरी फलटणकर नागरिकांनी सदरील उद्भवलेल्या परिस्थिती मुळे घाबरू नये, प्रसासन तुमच्या सोबतच आहे अशी खात्री देत नदी काढच्या नागरिकांना या वेळी दिला. नदीवरील नुकसान झालेल्या तिन्ही पुलाची पाहणी करुन दुरुस्ती करावी असे आदेश मुख्याधिकारी प्रसाद काटकर यांनी बांधकाम विभागास दिलेले आहेत. 

यावेळी माजी नगराध्यक्ष तथा विद्यमान नगरसेवक पांडुरंग गुंजवटे, आरोग्य सभापती सौ.दिपालीताई शैलेश निंबाळकर, नगरसेवक किशोरसिंह नाईक निंबाळकर, नगरसेविका सौ.प्रगती जगन्नाथ (भाऊ) कापसे, महादेव माने, राहुल निंबाळकर, पंढरीनाथ साठे, अजिंक्य पाटील, गणेश काकडे उपस्थित होते. 

फलटण शहरातील बाणगंगा नदी शेजारील शनिनगर, गणेशनगर (मलठण), पठाणवाडा येथील अतिवृष्टीमुळे प्रभावित झालेल्या भागास महाराष्ट्र विधानपरिषद सभापती मा.ना.श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर (महाराजसाहेब), मा.आ.दिपकराव चव्हाण साहेब, मा.श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर (बाबा), मा.श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर (बाबा) यांच्या मार्गदर्शनाखाली योग्य त्या उपाययोजना राबविण्यात येत आहेत. तरी नागरिकांनी आपली व कुटुंबातील सर्वांची काळजी घ्यावी. कोणीही मदतीपासून वंचित राहणार नाही, अशी खात्री माजी नगराध्यक्ष तथा विद्यमान नगरसेवक पांडुरंग गुंजवटे यांनी या वेळी दिली.

लोकप्रतिनिधी व अधिकारी यांनी बाधित कुटुंबियांची प्रत्यक्ष भेट घेऊन त्यांना आधार दिला, अतिवृष्टीमुळे प्रभावित झालेल्या भागातील पंचनामे तात्काळ करण्याच्या सूचना देण्यात येऊन प्रत्यक्षात पंचनामे करण्याचे काम सुरु करण्यात आले. प्रभावित भागातील रस्त्यावर चिखलाचा खच झाला होता ते रस्ते फायर ब्रिगेडची गाडी बोलावून साफ करण्याचे काम सुरु करण्यात आले. आरोग्य कर्मचाऱ्यांनी पुरात वाहून आलेली झाडे झुडपी काढण्याचे काम वेगाने सुरु केले आहे. प्रभावित क्षेत्रातील नागरिकांनी वरीलप्रमाणे तात्काळ कार्यवाही होत असल्याने समाधान व्यक्त केले.


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Don`t copy text!