तिरंगा फाऊंडेशनच्या कोरोना केअर सेंटरला दानशुरांची मदत

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


स्थैर्य, फलटण दि.०९ : पवारवाडी (आसू, ता.फलटण) येथील तिरंगा फाऊंडेशन संचलित डॉ.बुधाजीराव मुळीक कोरोना केअर सेंटरमध्ये पूर्व भागातील अनेक रुग्ण उपचार घेवून कोरोनामुक्त झाले आहेत. या कोरोना केअर सेंटरमध्ये रुग्णांना उत्तमोत्तम सुविधा देण्यात येत असून विविध दानशूर व्यक्तींकडून होणार्‍या मदतीमुळे हे शक्य झाले असल्याचे, तिरंगा फाऊंडेशनचे अध्यक्ष रणजित शिंदे यांनी सांगितले.

रणजित शिंदे यांनी आपल्या तिरंगा फाऊंडेशनच्या माध्यमातून पवारवाडी येथे 5 लाख रुपये खर्च करुन 50 बेडची व्यवस्था असलेले कोरोना केअर सेंटर सुरु केले. त्यातील 21 बेड ऑक्सीजन सुविधेसह असून या ठिकाणी रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांना दोन वेळेचे जेवण, नाष्टा, काढा आदी दिले जाते.

यासाठी मिळणार्‍या मदतीबद्दल रणजित शिंदे यांनी सांगीतले की, या कोरोना केअर सेंटरसाठी माढा लोकसभा मतदार संघाचे खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर हे दरमहा रुपये 50 हजार देत आहेत. गाडगेबाबा ग्रामस्वच्छता प्रतिष्ठान, हणमंतवाडी यांच्याकडून रोजचा नाष्टा पुरवला जातो. धनंजय भाऊसो पवार यांच्याकडून रोजच्या पाण्याची व्यवस्था करण्यात येते. विशाल माने (आसू), रणधीर माने (हणमंतवाडी), रणजित जगदाळे (मोरोची), रोहित इंगळे (हणमंतवाडी) यांच्याकडून प्रत्येकी 11 हजार मदत देण्यात आली आहे. शिवमुद्रा पुरुष बचतगट (इंगवले परिवार), बाळासाहेब तात्याबा देशमुख, मधुकर जगताप (हणमंतवाडी) यांच्याकडून 5 हजार रुपयांची मदत करण्यात आली आहे. धनंजय बाळासोा पवार व सहकार महर्षी हणमंतराव पवार सहकारी कुक्कुटपालन संस्थेकडीन रोजची अंडी उपलब्ध करुन दिली जात आहेत. सत्यजित गायकवाड यांच्याकडून फायर एक्स्टेशन व्यवस्था, संदीप पवार (हणमंतवाडी) यांच्याकडून रु.2 हजार व 50 मास्कचे वाटप, तानाजी बर्गे यांच्याकडून सॅनिटायझर, कृष्णाबाई माने यांच्याकडून रु. 1 हजार, वैभव नलवडे यांच्याकडून खाऊ वाटप, विठ्ठल निकम (पवारवाडी) यांच्याकडून रु.2 हजार, प्रमोद गाडे, संभाजी शेडगे (आसू) यांच्याकडून मोफत एल.पी.जी.गॅस, चंद्रहार पिसाळ यांच्याकडून कमी दरात कार्यालय, आवटे बंधू यांच्याकडून कमी दरात मंडप व्यवस्था, बाळासाहेब गेजगे यांच्याकडून कमी दरात जेवण व्यवस्था उपलब्ध करुन देण्यात आली आहे.


Back to top button
Don`t copy text!