स्थैर्य, फलटण : सध्या फलटण शहरासह तालुक्यामध्ये कोरोनाचे रुग्ण झपाट्याने वाढत आहेत. कोरोना मुळे आपल्या फलटण शहरातील व तालुक्यातील कोणाचा जीव दगावू नये म्हणून फलटण मध्ये ऑक्सिजन बेडची नितांत गरज आहे. फलटण मध्ये कमीत कमी ५०० ऑक्सिजन बेडची गरज पुढील काळामध्ये लागू शकते. त्या मुळे फलटण शहरातील व तालुक्यातील उद्योजक, व्यापारी, बांधकाम व्यावसायिक व दानशूर व्यक्तींनी सढळ हाताने मदत करावी. ऑक्सिजन बेड साठी केलेल्या मदतीने अत्यावश्यक असणाऱ्या कोरोनाबाधितांचे प्राण वाचणार आहेत. त्या मुळे दानशूर व्यक्तींनी सढळ हाताने मदत करावी, असे आवाहन फलटण नगर परिषदेचे मुख्याधिकारी प्रसाद काटकर यांनी केलेले आहे.