दैनिक स्थैर्य । दि. २३ फेब्रुवारी २०२२ । फलटण । निंबळक नं. १ विविध कार्यकारी सहकारी सेवा सोसायटी लि., निंबळक, ता. फलटण या संस्थेच्या संचालक मंडळ पंचवार्षिक निवडणूकित मोहनराव नाईक निंबाळकर यांच्या नेतृत्वाखालील राजे गट पुरस्कृत निमजाई देवी पॅनलने सर्व १३ जागा मोठ्या मताधिक्याने जिंकून सोसायटीवरील आपले निर्विवाद वर्चस्व सिद्ध केले आहे.
महाराष्ट्र विधान परिषद सभापती श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर, आ. दीपकराव चव्हाण, कृषी उत्पन्न बाजार समिती फलटणचे चेअरमन श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर, सातारा जिल्हा परिषद माजी अध्यक्ष व विद्यमान सदस्य श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर, सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक श्रीमंत शिवरुपराजे खर्डेकर, पंचायत समिती सभापती श्रीमंत विश्वजीतराजे नाईक निंबाळकर यांनी नवनिर्वाचित संचालकांचे अभिनंदन केले असून सर्व मतदारांना धन्यवाद दिले आहेत.
सर्वसाधारण मतदार संघात ७१५ मतदान झाले, त्यापैकी २८ मते अवैध ठरली ६८७ वैध मतांपैकी खालीलप्रमाणे मते घेवून निमजाई देवी पॅनलचे उमेदवार विजयी झाले. विजयी उमेदवार व कंसात त्यांना मिळालेली मते – धनसिंग शिवाजी कदम (४०८), दादासाहेब सुभेदार कदम (४०५), रमेश रामचंद्र कापसे (४०२), चंद्रकांत तुकाराम गायकवाड (३९७), शंभूराज मोहनराव नाईक निंबाळकर (४२०), विठ्ठल संभाजी निकम (४०८), अमृत सुरेंद्र पवार (३७४), विलास वामनराव यादव (३८३).
महिला राखीव मतदार संघात ७१५ मतदान झाले त्यापैकी १८ मते अवैध ठरली ६९७ वैध मतांपैकी (४१२) मते घेवून रोहिणी प्रकाश चव्हाण आणि (३८२) मते घेवून ललिता धनंजय ढमाळ विजयी झाल्या आहेत.
अनुसूचीत जाती जमाती राखीव मतदार संघात ७१५ मतदान झाले, त्यापैकी १३ मते अवैध ठरली ७०२ वैध मतांपैकी ४०८ मते घेवून वीरसेन एकनाथ भोसले, विमुक्त जाती भटक्या जमाती राखीव मतदार संघात ७१५ मतदान झाले त्यापैकी २१ मते अवैध ठरली ६९४ वैध मतांपैकी ४१४ मते घेवून प्रकाश बाबुराव पवार विजयी झाले, इतर मागास राखीव मतदार संघात ७१५ मतदान झाले त्यापैकी २२ मते अवैध ठरली ६९३ वैध मतांपैकी ४१२ मते घेवून मधुकर बापुराव बनकर विजयी झाले.
सहकार अधिकारी रविंद्र इनामदार यांनी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून काम पाहिले, त्यांना सोसायटी सचिव यांनी सहकार्य केले.