आई प्रतिष्ठानच्या वतीने विविध सामाजिक उपक्रम
दैनिक स्थैर्य | दि. ४ ऑक्टोबर २०२३ | बारामती |
सामाजिक काम केल्याने आत्मिक समाधान मिळते व मानव सेवा हीच खरी ईश्वरसेवा असल्याचे प्रतिपादन बारामती नगरपरिषदचे मा. बांधकाम सभापती सत्यव्रत काळे यांनी केले.
शरयू फौंडेशनच्या अध्यक्षा सौ. शर्मिला पवार यांच्या वाढदिवसानिमित्त आई प्रतिष्ठान व सत्यव्रत अर्जुनराव काळे मित्र परिवार यांच्या वतीने १ ऑक्टोबर २०२३ रोजी बारामतीमध्ये फूटपाथवरील भिक्षूक यांना ब्लँकेट वाटप व महिलांना गिफ्ट व साहित्य वाटप आणि मिशन बोर्डिंग येथील विद्यार्थ्यांसाठी स्नेहभोजन व केक कापण्याच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी सत्यव्रत काळे बोलत होते.
याप्रसंगी जिल्हास्तरीय जुदो कुस्ती स्पर्धेमध्ये बारामती शहरातील युवा पैलवान वंश गायकवाड व विनोद गायकवाड या दोन बंधूंनी द्वितीय क्रमांक मिळवल्याबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला.
या कार्यक्रमासाठी मा. उपनगराध्यक्ष नवनाथ बल्लाळ, अल्ताफ सय्यद, संचालक मुस्लिम बँक, चर्चेस ऑफ खराईस्टचे चेअरमन बाळासाहेब जाधव, सचिव रॉबर्ट गायकवाड व सुभाष जांभुळकर, सिद्धनाथ भोकरे, निलेश इंगुले, इम्रान पठाण, तानाजी पाथरकर, अनिल कदम, निलेश पलंगे, साधू बल्लाळ, सुधाकर काटे, भाऊसाहेब पडळकर, सुधाकर माने, राजेंद्र सोनवणे, विजय शितोळे, भालचंद्र ढमे, शेखर बनकर, सूरज देवकाते, रमेश देशपांडे, धर्माधिकारी यांच्यासह युवक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी नवनाथ बल्लाळ, अल्ताफ सय्यद, इम्रान पठाण, साधू बल्लाळ, तानाजी पाथरकर, बाळासाहेब जाधव, सुभाष जांभुळकर, गायकवाड सर या मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त करून शुभेच्छा दिल्या.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक अनिल सावळे-पाटील यांनी केले. आभार सत्यव्रत काळे यांनी मानले.