दैनिक स्थैर्य । दि. २१ नोव्हेंबर २०२२ । बारामती । बारामती येथील प्रसिद्ध संमोहन तज्ञ व समुपदेशक विजयकुमार काळे यांनी अनुभवाच्या आधारे हिप्नॉथेरपी क्षेत्रात अलौकिक व उल्लेखनीय काम केल्यामुळे त्याना रविवार दि.20 नोव्हेंबरमध्ये दिल्ली येथे आयोजित केलेल्या आंतरराष्ट्रीय कॉन्फरन्स ग्लोबल हुमन राईट्स कॉन्सिल कॉन्फरन्स मध्ये ग्लोबल इंटरनॅशनल युनिव्हर्सिटीच्या वतीने डॉक्टरेट इन हिप्नॉथेरपी ही मानद पदवी देऊन गौरवण्यात आले.
या प्रसंगी प्रो-व्हाईस चांसलर-आशिया , कॉमनवेल्थ व्होकेशनल युनिव्हर्सिटी, टोंगा चे डॉ. रिपु रंजन सिन्हा, वसिर्व अकॅडमी चे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सुधीर गौर व आर. के गुप्ता, सुनील बेलगावे, डॉ.किरण भोंगळे, डॉ. जयश्री एस. सुरवसे, श्री. सुनील देवरडे,
ऍड.अशोक सूद शास्त्री, कुमार राजेश आदी मानव्यर उपस्तित होते.
संमोहन क्षेत्रातील गेल्या 12 वर्षांच्या कालावधीत अनेक विद्यार्थी, नागरिक यांना संमोहन द्वारे समूहपदेशन केले रुग्णाच्या विविध समस्या सोडविण्यासाठी यांचा वापर करणार असल्याचे विजयकुमार काळे यांनी सांगितले.