दैनिक स्थैर्य | दि. 29 डिसेंबर 2023 | फलटण | फलटण शहरासह तालुक्यामध्ये असणाऱ्या कोणत्याही ओबीसी नेता, कार्यकर्ता किंवा ओबीसी सामान्य नागरिकांना जर राजकीय पक्ष, सामाजीक संघटनेकडुन जाणून बुजुन टार्गेट केले जात असेल किंवा व्यक्तीगत त्रास दिला जात असेल तर यापुढे ओबीसी संघर्ष समितीच्या वतीने उठाव केला जाईल व जशास तसेच उत्तर दिल जाईल; असे मत ओबीसी संघर्ष समिती फलटण तालुक्याचे अध्यक्ष बापूराव शिंदे यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे व्यक्त केले.
ओबीसी समाज व संघर्ष समितीच्या वतीने सामाजीक बांधिलकी जोपासली जातेच व यापूढे सुद्धा जोपासली जाईलच; परंतु इतरांची पण ती जबाबदारी आहे. फलटणला सामाजिक व सांस्कृतीक परपंरा जपण्याची सर्वांचीच जबाबदारी आहे. काल झालेल्या कार्यक्रमात ओबीसी समाजच्या नगरसेवकांनी एकी दाखवून कार्यक्रमावर बहिष्कार टाकल्याबद्दल सर्व ओबीसी नगरसेवकांचे आभार सुद्धा ओबीसी संघर्ष समितीच्या वतीने अध्यक्ष बापूराव शिंदे यांनी प्रसिद्धीपत्रकात मानले आहेत.