नुकसानीचा पंचनामा करताना एकही शेतकरी वंचीत ठेवू नका – आ. शिवेंद्रसिंहराजे; घाईगडबडीत प्रस्ताव न करण्याच्या प्रशासनाला सुचना

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

 

शेतात जावून पिकांच्या नुकसानीची पाहणी करताना आ. श्रीमंत छ.
शिवेंद्रसिंहराजे भोसले. शेजारी पदाधिकारी आणि महसूल व कृषी विभागाचे
अधिकारी


स्थैर्य, सातारा, दि.१९: अतिवृष्टीमुळे शेतकर्‍याच्या हातातोंडाशी आलेले पिक नष्ट झाले आहे. सातारा आणि जावली तालुका हा डोंगरी भाग आहे. या परिसरात पावसामुळे भात, सोयाबीन या पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. तसेच काही भागात नाचणी, भुईमूग, ऊस याही पिकांचे नुकसान झाले आहे. शेतकर्‍याची पिके शेतातच नष्ट झाली आहेत. त्यामुळे प्रशासनाने ६५ मी.मी. पर्जन्यमानाचा निकष न लावता आणि प्रस्ताव तयार करुन पाठवायचाय म्हणून घाईगडबड न करता गांभिर्याने पंचनामे करावेत. पंचनामा करताना एकही शेतकरी वंचीत राहणार नाही याची खबरदारी प्रशासनाने घ्यावी, अशा सक्त सुचना आ. श्रीमंत छ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी अधिकार्‍यांना केल्या. 

अतिवृष्टीमुळे सातारा आणि जावली मतदारसंघातील असं‘य शेतकर्‍यांची भात, सोयाबीन यासह नाचणी, भुईमूग, ऊस आदी पिके नष्ट झाली असून शेतकर्‍यांचे मोठे नुकसान झाले आहे. नुकसानीचे पंचनामे योग्य पध्दतीने होवून शेतकर्‍यांना शासनाची मदत मिळावी यासाठी आ. शिवेंद्रसिंहराजे यांनी नुकसानग‘स्त भागाची पाहणी केली. प्रत्यक्ष शेतात जावून आ. शिवेंद्रसिंहराजे यांनी परिस्थितीचा आढावा घेतला आणि उपस्थित अधिकार्‍यांना पंचनामे करताना कोणीही वंचीत राहू नये याबाबत सुचना केल्या. सातारा तालुक्यातील कण्हेर, वेळेकामथी, चोरगेवाडी आदी परिसरात पाहणी करताना आ.शिवेंद्रसिंहराजे यांच्यासमवेत जिल्हा परिषद सदस्य प्रतीक कदम, पंचायत समितीच्या सभापती सौ. सरिता इंदलकर, तहसिलदार आशा होळकर, सहायक गटविस्तार अधिकारी संजय ढमाळ, मंडल कृषी अधिकारी संतोष पवार, बी.एन. केवटे, ए.के. पवार यांच्यासह शेतकरी उपस्थित होते. जावली तालुक्यातील मोरावळे व परिसरातील पिक नुकसानीची पाहणी करताना आ. शिवेंद्रसिंहराजे यांच्यासमवेत तहसिलदार राजेंद्र पोळ, गट विकास अधिकारी सतीश बुध्दे, तालुका कृषी अधिकारी रमेश देशमुख यांच्यासह मंडल अधिकारी, तलाठी, ग्रामसेवक, कृषी सहायक आणि शेतकरी उपस्थित होते.

शेती पिके शेतातच नष्ट झाली असून शेतकर्‍यांचे न भरुन येणारे नुकसान झाले आहे. ज्या भागात ६५ मी.मी. पाऊस झाला असेल त्या भागातील पंचनामे करण्याचा शासनाचा निकष आहे. असे असले तरी अनेक गावांमध्ये ६५ मी.मी. पाऊस झाला नसला तरीही पाऊस, वादळवार्‍यामुळे पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे शासनाचा हा निकष न लावता प्रशासनाने सर्वच नुकसानग‘स्त पिकांचे पंचनामे करावेत. सरकारने आदेश दिला म्हणून प्रस्ताव पाठवायचे म्हणून घाईगडबडीत कसेतरी पंचनामे करुन कागदी घोडे पुढे सरकवू नयेत, अशा सक्त सुचना आ. शिवेंद्रसिंहराजे यांनी उपस्थित अधिकार्‍यांना केल्या. तसेच सरसकट नुकसानीचे पंचनामे करुन सुयोग्य पध्दतीने प्रस्ताव शासनाकडे सादर करा आणि हे करताना नुकसानग‘स्त एकही शेतकरी वंचीत राहू नये, नंतर कोणात्याही शेतकर्‍याची तक‘ार येवू नये याची काळजीपुर्वक खबरदारी घ्या, असेही आ. शिवेंद्रसिंहराजे यांनी अधिकार्‍यांना सांगतले.


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Don`t copy text!