अपेक्षाविरहीत दुसऱ्याचे शुभ करावे

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

शुभकार्यात आपण नेहमीच चांगले करीत असतो.
कोणत्याही अपेक्षेशिवाय कोणाचेही चांगले करण्याचा प्रयत्न करावा.

जे लोक नेहमी फुले वाटतात,
त्यांच्या हातांना ही नेहमी सुगंध दरवळत राहतो.

भगवंतला गंध लावताना सानीवर चंदन उगळताना सान सुगंधीत, उगळणारे हात व बोट सुगंधीत, देवाच मस्तक सुगंधीत.होते.कारण चंदनाला अपेक्षाच नसते. तसे आपल्या अवती भवती असे अनेक चंदनरुपी खोडे दुस-यांना आनंदित करत असतात. फुलातील सुगंध वा-यावरती स्वार होऊन चहूमुलखात सुवास पेरीत असतो.तरी त्यांच्याकडील सुगंध संपत नाही.कारण अपेक्षाच फक्त चांगले करण्याची असल्याने काहीच कमी पडत नाही.

आपण सुद्धा समाज्यात कार्य करीत असताना अपेक्षा विरहीत केल्यास आनंदच भेटणार.निस्वार्थीपणे केलेले कार्य निश्चितच आनंद देऊन जाते.करता आले तर चांगले करावे.अन्यथा त्या वाटेला जाऊ नये.चांगल्या कर्माची फळे चांगलीच भेटतात.आपण फळाची अपेक्षा न करता फुलाप्रमाणे सदोदित सुगंधीत असावे.

समाज्यात आपल्यासारख्या चांगुलपणाच्या व्यक्तीमत्वामुळेच हे जीवनचक्र सुरळितपणे सुरु आहे.फुलं हाती भावना ही चांगली अन् सुगंधीत प्रवृत्ती निर्माण होती.केल्याने होत आहे रे,आदि चांगले केलीच पाहिजे.

समाज्यात काही माणसं खरंच सुख दुःखात काळ्या रात्री,वेळेला हजर राहून सेवा देतात.त्यांच्या प्रवृत्तीत चांगुलपणाची भावना ओतप्रोत भरलेली असते.आपणाला नडलेला सुद्धा त्यांच्या नजरेत चांगलाच असतो.कारण फुलांना उमलणे फुलणे बहरणे माहित असते.त्यापरीस आपणाला तोडून नेणारे हे ठाऊक असून देखील सुगंधीत पणा सोडत नाहीत.तसेच आपण आपल्यापरीने जिथं जाऊ तिथं चांगलेच करु.तुमच्या शाश्वत संपत्तीत भरच पडणार.

आपलाच सुगंधीत ​– प्रा. रवींद्र कोकरे – ग्रामीण कथाकार,

श्रीमती प्रेमलाताई चव्हाण हायस्कूल व ज्युनियर कॉलेज, फलटण.
९४२१२१६८२१


Back to top button
Don`t copy text!