दैनिक स्थैर्य । दि. १८ जून २०२२ । बारामती । बारामती तालुक्यातील ज्ञानसागर गुरुकुल इंग्लिश मिडीयम स्कुल व ज्युनिअर कॉलेजमध्ये इयत्ता 10 वी च्या 100% निकालाने खूप मोठा यशाचा मानाचा तुरा रोवला गेला. मार्च/ एप्रिल 2022 दरम्यान झालेल्या माध्यमिक शालांत परीक्षेमध्ये शष्टीका अविनाश आवाळे 94.40% गुण मिळवून 1350-03 या उपकेंद्रात प्रथम क्रमांक मिळविला. तसेच शाळेतील एकूण 21 विद्यार्थ्यांनी बोर्डाची परीक्षा दिली. 21 पैकी 9 विद्यार्थ्यांनी 90% पेक्षा जास्त गुण मिळवून ज्ञानसागर साठी एक सुवर्ण इतिहास रचला. यामध्ये द्वितीय क्रमांक निकिता खरात (92.60%), तृतीय क्रमांक स्नेहल काळे (92.40%), चतुर्थ क्रमांक साक्षी काळे (92.00%), स्वामिनी तिवाटने (91.20%), अभिजीत ठोंबरे (90.60%), शैलेंद्र पाल (90.40%), प्रतीक काळे (90.40%), शुभम खरात (90.00%), दिक्षा शेळके (89.80%),आदित्य चव्हाण (89.60%), प्रसाद म्हेत्रे (88.60%), समर्थ वणवे (88.20%), प्रसाद बोबडे (87.40%), प्रथमेश देवकाते (86.80%), मल्हार अंगारखे (86.60%), राहुल बंडगर (86.20%), भावना रावत (85.60%), अबेद रझवी (81.70%), सचिन ढाळे (80.40%), मनन पंडित (74.80%) सदर परीक्षेत विद्यार्थ्यांनी ज्ञानसागरला साजेसं यश संपादन केल्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये, पालकांमध्ये व शिक्षकांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन केल्यामुळे संस्थेचे संस्थापक अध्यक्ष सागर आटोळे सर, दिपक सांगळे, रेश्मा गावडे,मानसिंग आटोळे, पल्लवी सांगळे, दिपक बिबे, सीईओु संपत जायपात्रे, विभाग प्रमुख गोरख वणवे, मुख्याध्यापक दत्तात्रय शिंदे, निलिमा देवकाते, स्वप्नाली दिवेकर, राधा नाळे व सर्व शिक्षकांचे कौतुक केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.