स्थैर्य, फलटण : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदा संत ज्ञानेश्वर महाराज पायी वारी सोहळा रद्द करण्यात आला आहे. यंदा महाराष्ट्र परिवहन महामंडळ म्हणजेच लाल परीने पंढरीच्या पालखीची वारी होणार असल्याने आज बसने पालखी सोहळा जात असताना फलटण तालुक्यात ठिकठिकाणी भाविकांनी एसटी मार्गावर गर्दी करून लांबूनच श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखीच्या बसचे दर्शन घेतले व माउलींच्या नामाचा जयघोष केला.
या वारीसाठी सरकारकडून काही नियम देण्यात आले आहेत. बसने जाणाऱ्या संतांच्या पालख्या रस्त्यात कोठेही न थांबता पंढरपूरसाठी आज मंगळवारी प्रस्थान झाल्या. संत श्री ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा पुणे, सासवड, जेजुरी, नीरा, लोणंद मार्गे आज फलटण तालुक्यात बसने येताच वाटेत रस्त्यावर ठिकठिकाणी भाविकांनी गर्दी करून लांबूनच दर्शन घेतले. काहींनी पालखी ठेवलेल्या बसला हात लावून दर्शन घेतले फलटण शहरात क्रांतिसिंह नाना पाटील चौक येथे मोठी गर्दी भाविकांनी केली होती सरकारकडून प्रत्येक पालखीसोबत बसमधून केवळ वीस वारकऱ्यांना परवानगी देण्यात आली आहे. तसेच पालखी रस्त्यात दर्शनासाठी थांबवता येणार नाही. त्यामुळे बस कोठेही थांबली नाही व पुढे बस मधून पालखी सोहळा मार्गस्त झाला.