स्थैर्य, वाई, दि.१६: वाईतील पेढे व मिठाईला सातासमुद्रापार नेऊन वाई शहराचा नावलौकिक वाढविणारे खामकर उद्योग समुहाचे संस्थापक व जुन्या पिढीतील यशस्वी उद्योजक ज्ञानेश्वर शंकरराव खामकर ( वय ८८ ) यांचे वृध्दापकाळाने निधन झाले.त्यांच्या मागे तीन मुले एक मुलगी सुना नातवंडे असा परीवार आहे.
खामकर पेढ्याचा स्वतंत्र ब्रँड ला फार कष्टातून त्यांनी नावारूपाला आणले.त्यांच्या पेढ्याचा सर्वदूर मोठी मागणी असते.व्यवसायाच्या अनुषंगाने त्यांचा लता मंगेशकर,भीमसेन जोशी, बाबासाहेब पुरंदरे शरद पवार,नितीन गडकरी आदी राजकीय उद्योग सामाजिक शैक्षणिक क्षेत्रातील अनेक नामवंतांशी संबंध आला.ते धार्मिक वृत्तीचे होते.त्यांनी वाईच्या कृष्णातीरावरील अनेक छोट्या मोठ्या मंदिरांचा जीर्णोद्धार केला.त्यांना वाई भूषण पुरस्कार देऊन गौरविण्यात आले होते.परिसरातील अनेक संस्थांशी त्यांचा निकटचा सबंध होता.त्यांच्या मागे ऍड सुरेश,नंदकुमार व रमेश हे व्यावसायिक चिरंजीव आहेत.रविवार पेठेतील स्मशान भूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.