दैनिक स्थैर्य | दि. १४ जुलै २०२४ | विम्बल्डन |
विम्बल्डन चषकात यंदा सलग दुसर्यांदा स्पेनच्या कार्लोस अल्काराझनं सर्बियाच्या नोव्हाक जोकोविचचा पराभव केला. कार्लोसनं जोकोविचला ६-२, ६-२, ७-५ नं पराभव केला.
आघाडीचा टेनिसपटू सर्बियाच्या नोव्हाक जोकोविच याला विम्बल्डनच्या निर्णायक सामन्यात पुन्हा एकदा पराभवाचा सामना करावा लागला. २१ वर्षीय कार्लोस अल्काराझ याने जोकोविचचा पराभव करत ग्रँडस्लॅम जिंकले. अटीतटीच्या सामन्यात स्पेनच्या कार्लोस अल्कारेज याने विम्बल्डन चॅम्पियनशीप २०२४ वर नाव कोरले. रविवारी (१४ जुलै) झालेल्या फायनल सामन्यात अव्वल स्थानावर असणार्या कार्लोस अल्काराझ याने अनुभवी नोव्हाक जोकोविच याचा पराभव केला. ३ सेटपर्यंत झालेल्या रोमांचक सामन्यात कार्लोस अल्कारेज याने विजय मिळवला.
विम्बल्डन चषकात यंदा सलग दुसर्यांदा स्पेनच्या कार्लोस अल्काराझनं सर्बियाच्या नोव्हाक जोकोविचचा पराभव केला. कार्लोसनं जोकोविचला ६-२, ६-२, ७-५ नं पराभव केला. केवळ २१ व्या वर्षी त्यानं हे यश मिळवलंय. २४ वेळा ग्रँडस्लॅमवर नाव कोरणार्या नोव्हाक जोकोविचला गतवर्षी झालेल्या विम्बल्डन फायनलमध्ये कार्लोस अल्काराझनं पराभूत केले होते. यंदाही कार्लोस अल्काराझनं विम्बल्डनवर नाव कोरलेय. विम्बल्डनचे खिताब सलग दोन वेळा मिळवणारा इतिहासात तो केवळ तिसरा खेळाडू आहे.
कार्लोस अल्काराझने २०२४ विम्बल्डन फायनलमध्ये जोकोविचविरुद्ध पहिल्या दोन सेटमध्ये निर्वादित वर्चस्व राखले होते. कार्लोसने पहिले दोन सेट ६-२, ६-२ आशा फरकाने सहज जिंकले होते. पण तिसर्या सेटसाठी त्याला खूप संघर्ष करावा लागला. तिसरा सेट टायब्रेकरपर्यंत गेला, ज्यामध्ये २१ वर्षीय कार्लोसने कारकिर्दीतील चौथे ग्रँडस्लॅम जेतेपद पटकावले.