स्थैर्य, दि. २: सर्बियाच्या अव्वल मानांकित नोवाक जोकोविच याने दामिर झामूर याचा ६-१,
६-४, ६-१ अशा सरळ तीन सेटमध्ये पराभव करत यूएस ओपन ग्रँडस्लॅम स्पर्धेच्या
दुसर्या फेरीत प्रवेश केला. दुसर्या फेरीत त्याचा सामना काईल एडमंड
याच्याशी होणार आहे.
या विजयासह जोकोविचने यंदाच्या कॅलेंडर वर्षातील आपल्या जय-पराजयाचा
रेकॉर्ड २४-० असा केला. एडमंड याने आलेक्झांडर बुबलिक याला २-६, ७-५, ७-५,
६-० असा धक्का दिला. जोकोविच याचा एडमंडविरुद्धचा रेकॉर्ड ५-१ असा जबरदस्त
आहे. महिला एकेरीत झेक प्रजासत्ताकच्या अव्वल मानांकित कॅरोलिना प्लिस्कोवा
हिने युक्रेनच्या ऍनहेलिना कलिनाना हिला नमवून विजयी सलामी दिली. हा सामना
केवळ एक तास ३ मिनिटे चालला.
अन्य महत्त्वाचे निकाल ः पुरुष एकेरी ः पहिली फेरी ः आलेक्झांडर झ्वेरेव
(५) वि. वि. केविन अँडरसन ७-६, ५-७, ६-३, ७-५, डॅनिस शापोवालोव (१२) वि.
वि. सेबेस्तियन कोर्डा ६-४, ४-६, ६-३, ६-२, स्टेफानोस त्सित्सिपास (४) वि.
वि. अल्बर्ट रामोस विलोनास ६-२, ६-१, ६-१, डॅनिस श्वाटर्र्झन (९) पराभूत
वि. कॅमेरून नोरी ६-३, ६-४, २-६, १-६, ५-७, डेव्हिड गॉफिन (७) वि. वि.
रायली ओपेलका ७-६, ३-६, ६-१, ६-४
महिला एकेरी ः पहिली फेरी ः नाओमी ओसाका (४) वि. वि. मिसाकी डोई ६-२,
५-७, ६-२, ऍलिसन रिस्के (१३) वि. वि. तातियाना मारिया ६-३, ६-२, पेट्रा
क्विटोवा (६) वि. वि. इरिना कामेलिया बेगू ६-३, ६-२, पेट्रा मार्टिक (८)
वि. वि. तेरेझा मार्टिनकोवा ५-७, ६-२, ६-४, मार्केटा वोंदरुसा