दैनिक स्थैर्य | दि. ३० ऑक्टोबर २०२१ | सातारा | वळसे ता. सातारा येथील अजिंक्तारा सहकारी सूत गिरणीतील कामगार कर्मचाऱ्यांना दिपावलीनिमित्त १० टक्के सानुग्रह अनुदान देण्यात आले असून त्याचे वाटप श्रीमंत छ. सौ. वेदांतिकाराजे भोसले यांच्या हस्ते करण्यात आले. यामुळे सूत गिरणीतील कामगार, कर्मचाऱ्यांची दिवाळी गोड झाली आहे.
सूत गिरणी उभारणीकामी सभासदांचे मोलाचे सहर्का लाभले आहे. सूत गिरणीने अत्याधुनिक प्रकारच्या मशिनरी बसविल्या असल्यामुळे जागतिक तसेच लोकल मार्केटमध्ये गिरणीच्या सूतास चांगल्या प्रकारे मागणी वाढली आहे. गिरणीने चालू वर्षामध्ये निर्यातक्षम सूताची निर्मीती करून परदेशात अजिंक्यस्पिन सूत मोठ्या प्रमाणात निर्यात केले आहे. सध्याच्या कोव्हीड-१९ च्या कालावधीतही सूतगिरणीचे कामकाज गिरणीचे अधिकारी व कर्मचारी तसेच महिला कामगार यांनी कौतुकास्पद व काटकसरीने चालवून गिरणी प्रगतीपथावर नेण्यासाठी नियोजन पूर्वक वाटचाल चालविली आहे. ही बाब कौतुकास्पद असून कामगार कर्मचाऱ्यांना प्रोत्साहन देण्याचे धोरण संचालक मंडळाने सुरुवातीपासूनच राबविले आहे. त्या धोरणानुसारच कामगार कर्मचाऱ्यांना दिपावलीसाठी सानुग्रह अनुदान वाटप करण्यात आल्याचे गिरणीचे मार्गदर्शक संचालक आ. श्रीमंत छ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी स्पष्ट केले.
सूत गिरणीच्या मार्गदर्शक सौ. वेदांतिकाराजे भोंसले, चेअरमन उत्तमराव नावडकर यांच्या हस्ते कामगार कर्मचाऱ्यांना सानुग्रह अनुदान वाटप करण्यात आले. यावेळी गिरणीचे व्हा. चेअरमन बापूराव महाडीक, संचालक बळिराम देशमुख, अजित साळुंखे, जगन्नाथ किर्दत, भरत मतकर, भरत कदम, सचिन गायकवाड, सुरेश टिळेकर, रघुनाथ जाधव, आबासो साबळे, गणपतराव मोहिते, अशोक काठाळे, उल्हास भोसले, सुनिल देशमुख, भगवान शेडगे, संचालिका सौ. रत्नमाला डांगे, सौ. साधना फडतरे, गिरणीचे र्काकारी संचालक संजय कुलकर्णी, चीफ अकौंटंट मानसिंग पवार, प्रॉडक्शन मॅनेजर रमेश निळकंठ, मिल इंजिनिअर प्रदीप राणे, एच.आर. मॅनेजर राजेश दिक्षीत, सर्व कर्मचारी व महिला कामगार उपस्थित होते.