दैनिक स्थैर्य । दि. २३ ऑक्टोबर २०२२ । बारामती । बारामती तालुक्यातील सावळ मधील ज्ञानसागर गुरुकुलच्या नाविन्यपूर्ण उपक्रमांतर्गत दिवाळी सुट्टी निमित्त विद्यार्थ्यांना शालेय शिक्षणाबरोबरच व्यवसायिक व व्यवहारिक दैनंदिन जीवनात मार्केटिंग कसे करावे एखाद्या व्यवसायात गुंतवणूक करून त्यात नफा कसा मिळवावा याचा प्रत्यक्ष अनुभव येण्यासाठी थ्री डी पणती तयार करून विक्रीचा उपक्रम हाती घेतला होता त्यासाठी विद्यार्थ्यांना पणत्या संबंधित खरेदी-विक्रीे, मार्केटिंगचे ज्ञान व आनंद मिळण्यासाठी विद्यार्थ्यांना पालकांचे सहकार्य लाभले. ज्ञानसागर गुरुकुलच्या विद्यार्थ्यांनी सहा दिवसांमध्ये तीन लाख 54 हजार रुपयांच्या पणत्यांची विक्री करून 1 लाख 72 हजार रुपयांचा नफा मिळवून शिक्षणाबरोबरच व्यावसायिक व व्यावहारिक शिक्षणाचे धडे घेतले.
या उपक्रमांतर्गत होणाऱ्या नफ्यातून गरीब व गरजू विद्यार्थ्यांना मदत करणार असल्याचे संस्थेचे अध्यक्ष प्रा.सागर आटोळे यांनी सांगितले.
विद्यार्थ्यांना या उपक्रमात प्रि प्रायमरीच्या मुख्याध्यापिका निलिमा देवकाते, दत्तात्रय शिंदे, स्वप्नाली दिवेकर, राधा नाळे, रिनाज शेख, सारिका भुसे, तांबे सर तसेच ज्ञानसागर गुरुकुलच्या सर्व शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी व पालक वर्ग यांचे मार्गदर्शन व सहकार्य केले.
बारामती, इंदापूर, फलटण आदी तालुक्यातून येणाऱ्या विद्यार्थ्यांनी आपल्या गावोगावी पणत्यांची विक्री केली व व्यवहारिक ज्ञान प्राप्त केले.