
स्थैर्य, फलटण, दि. 24 ऑक्टोबर : दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर, माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या वतीने आणि आमदार सचिन पाटील यांच्या नियोजनातून फलटण शहरातील नागरिकांना किराणा साहित्याच्या दिवाळी किटचे वाटप करण्यात आले. या उपक्रमामुळे अनेक कुटुंबांना दिवाळी सण साजरा करण्यासाठी मोठा हातभार लागला.
फलटण शहरातील प्रभाग क्रमांक आठमधील नागरिकांसाठी माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या वतीने या दिवाळी किराणा किटचे वाटप करण्यात आले. या कार्यक्रमासाठी माजी नगरसेवक सुदामराव मोढवे, अनुप शहा, अजय माळवे, फिरोज आतार, लतीफ तांबोळी, सनी मोढवे, सिद्धाली शहा, डॉ. अनिल श्रीवास्तव, चंदन साळुंखे, विकास कर्वे, बाबू नलवडे उपस्थित होते.
याबरोबरच मयूर कर्वे, तानाजीराव कदम, राहुल मतकर, संगीता भोसले, रुपाली साळुंखे, रोहिणी ढमाकळे, स्वप्नाली कर्वे, केदार कर्वे व भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. मान्यवरांच्या हस्ते प्रभागातील गरजू नागरिकांना या किट्सचे वितरण करण्यात आले.
प्रभाग क्रमांक तेरामध्ये देखील माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या माध्यमातून आणि आमदार सचिन पाटील यांच्या विशेष नियोजनातून घरगुती सामानाच्या किट्सचे वाटप करण्यात आले. या कार्यक्रमासाठी आमदार सचिन पाटील यांचे सुपुत्र सत्यजित सचिन पाटील व शिवेंद्र सचिन पाटील, युवा उद्योजक श्रीवल्लभ हेंद्रे, स्वप्नील लोंढे, आदित्य पाठक यांची प्रमुख उपस्थिती होती.
दिवाळी हा दिव्यांचा आणि आनंदाचा सण आहे. या काळात प्रत्येक घरात उत्साहाचे वातावरण असते. मात्र, काही कुटुंबांना आर्थिक परिस्थितीमुळे सण साजरा करताना अडचणी येतात. नेमकी हीच बाब लक्षात घेऊन माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर आणि आमदार सचिन पाटील यांनी हा मदतीचा हात पुढे केला आहे.
या किराणा किटमध्ये दिवाळीसाठी लागणाऱ्या आवश्यक वस्तूंचा समावेश असल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केले. या उपक्रमामुळे सण साजरा करणे सुकर होणार असल्याची भावना अनेकांनी व्यक्त केली. लोकप्रतिनिधींनी सणासुदीच्या काळात दाखवलेल्या या सामाजिक जाणीवेबद्दल नागरिकांनी त्यांचे आभार मानले.

