फुलाच्या संगतीत असलेला कीटक थोर माणसांच्या व भगवंतच्या
मस्तकापर्यंत चढतो. मोठ्या लोकांनी व्यवस्थितरीत्या
बसविलेला दगड देवत्वाचा दर्जा मिळवतो.महिमा हा संगतीचा व सहवासाचा असतो.पिंडवरचा विंचू अथवा सर्प नमस्कारास पात्र फक्त सहवासामुळेच.बाप्पा बरोबरच मूषक हा सुद्धा संगतीने पवित्र होतो.
मनुष्य देह हा अनेक विकाराने तयार झाला आहे. षड्विकार नेहमीच अधोगतीला उत्सुक असतात. सद्गुणाचा परिपाक शिखरावर नेण्यास तयार होतो. आपण कोणाच्या संगतीत आहे.यावरुन मूल्यमापन ठरलेल असते.
देवत्वाचा व मनुष्यत्वाचा दर्जा प्राप्त करणं जसं मेहनतीनं सिद्ध करता येतं तसं संगतीने सुद्धा येतं. दगडाला शेंदूर लावला की देव झाला असे होत नाही.तर त्यात अनेक संगतीचा व सहवासाचा घटक महत्त्वाचा आहे.
देवत्व व मनुष्यत्व हे आपल्या कर्माने , कष्टाने, सचोटीने, संस्काराने, कर्तृत्वाने प्राप्त होते.पण आपल्यातील अवगुण आपणांस कधी कधी आयोग्य मार्गाकडे घेऊन जातात. त्यावेळी सहवास फार महत्वाचा आहे. फुलातील किटक हा खरं तर फूल कुरतड्यासाठी येतो. पण फुलांच्या चांगुलपणामुळे किटक सुद्धा भगवंताच्या गळ्यात विराजमान होतो. त्याचही जयजयकार होत असतो. अश्यावेळी किटकाने आपल्यात बद्दल घडून आणल्यास त्याची ही गणना चांगल्यात होते.
दस-याच्या दिनी रावण दहन केले जाते. महिषासूराचा वध होतो. यातून आपण हाच बोध घेणं की आपल्यात ह्या प्रवृत्ती सहवास करीत असतील तर काय करावे. दहन रावणाचे की आतल्या वासना विकार कर्मकांड अंधश्रद्धा चालीरिती रुढी परंपरा भेदभाव यांचे काय करायचे. अत्याचार भ्रष्टाचार बलात्कार यांचे पेवच फुटले आहे. कायद्याचा धाक जाऊ द्या . निदान आपल्यातील ह्दयी वसलेल्या भगवंताचे स्मरण असावे. माणस माणसा सारखी वागताना दिसनात. आपण चाललो रावण दहन करायला. आपल्यातील या प्रवृत्तीचे समूळ उच्चाटन केल्यास प्रतिकात्मक दहनाची जरुरी काय आहे. आपल्यातील असूरी प्रवृत्तीला लगाम घालण्यासाठी चिंतन वाचन मनन यायांची गरज आहे. परस्री माते समान म्हणून चालणार नाही. आचरण महत्वाचे. तेव्हाच मनुष्यत्वाचा अंगीकार होईल.
आज समाज्यात भयवाह परिस्थिती आहे. सैतानी रुपी मनुष्यत्व कोणत्या थाराला जाईल.हे सांगता येणं महाकठिण काम आहे. वासनारुपी पूरवृत्ती वाढतच चालली आहे. यावर प्रतिबंध म्हणजे आपला समोरिल व्यक्तीकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलला पाहिजे. मातेचे नवरात्र व जागर करणं सोपे आहे. पण त्यातून समोरिल व्यक्तीकडे भावमयता नजरेनं पाहणे इष्ट ठरणार आहे.
मनुष्यत्व प्राप्त करण्यासाठी चांगल्या विचारांत , आचरणांत , संस्कारांत, चिंतनांत निरतंर असावे . मनुष्यत्व व पशुत्व यात काही वेळा फरकच दिसत नाही. प्रसंगी पशुत्व हे माणसाळल्यास देवमाणसांसारखे वागतात. वाल्याचा वाल्मिकी, नराचा नारायण होता येतं. आपण कोणाबरोबर अन् कोणाच्या संगतीत आहे. त्यावरुन आपली किंमत ठरते. संगतीने घडणे अन् बि घडणे होत असते.
नव्या पिढीने सकस खावे. चिंतन करावे. योगाभ्यास करावा. नाविन्याचा ध्यास घ्याव. न्यूनगंड हद्दपार करावा. सकारात्मक ऊर्जा वाढवावी. कल्पनाशक्तीला चालना द्यावी .या वासात व संगतीत नव्या पिढीच सोनं होणारच. फक्त बद्दल घडविण्याची अन् घडण्याची नितांत गरज आहे. जुनाट खोडाला सुदीक नव्या बहरलेल्या पालवीने जगण्याची ऊर्मी जागी होऊन कोंबारे फुटतात.
दुधाला विरजणं भेटल दही. दह्याला घुसळण भेटलं ताक अन् लोणी. लोण्याला कडवलं की तुप तयार. हे सारं संगतीने घडते.
आंबट लिंबाला साखरेची संगत व चिमूटभर मीठाची जोडणी केल्यास जलरुपी गोड सरबत तयारच होणार. आपण सुदिक अनेक चवींना एकत्रित करुन स्वादिष्ट व चविष्ट सेवन करावे.
आपल्या सारख्याच सहवासात आम्हांला घडता आले. हेच परम भाग्य आहे. सुसंगत , सहवास यांने जीवनात रंगत येते. मंगलमय जीवनासाठी सहवास महत्वाचा आहे. आपल्यातील चांगुलपणाची गोडी वाढविण्याठी सद्गुणाची पेरणी केल्यास वागण्याचे विवेक रुपी पिक जोमदारच येणार. मनुष्यत्व असणं हेच भगवंताच देणं आहे. आसूरी व सूरी प्रवृत्ती यांचे संमिश्रण मंजे ख-या अर्थाने मनुष्यत्व होय. मनुष्यत्व अंगीकारणे काळाची गरज आहे. माणसं कधी कधी इतकी भयाण वागतात की, आपला विश्वासच बसत नाही. आपल्यातील देवत्व जागृत होण्यास असूरी रुपी मनुष्यत्व आड येते. त्यासाठी आपल्यातील अप्रवृत्तीच दहन करुन देवत्व नको पण मनुष्यत्व निर्माण व्हावे.
प्रा. रवींद्र कोकरे – ग्रामीण कथाकार,
श्रीमती प्रेमलाताई चव्हाण हायस्कूल व ज्युनियर कॉलेज, फलटण.
९४२१२१६८२१