दैनिक स्थैर्य । दि. २० डिसेंबर २०२१ । सातारा । जिल्हा दक्षता समितीची बैठक नुकतीच जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी शेखर सिंह यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. यावेळी सहायक आयुक्त समाज कल्याण नितीन उबाळे व समितीचे सदस्य उपस्थित होते.
न्यायालयामध्ये प्रलंबित असणारी प्रकरणे तात्काळ निकाली काढून अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती (अत्याचार प्रतिबंधक) अधिनियम 1989 अंतर्गत पिडीत व्यक्तींना न्याय मिळवून द्यावा. पोलीस तपासावर प्रलंबित प्रकरणांमध्ये तात्काळ दोषारोप दाखल करण्याविषयी पोलीस विभागास सुचित केले. तसेच वैद्यकीय अहवाल तात्काळ सादर करण्याबाबतच्या सूचना जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी जिल्हा दक्षता समितीच्या बैठकीत संबंधितांना दिल्या.