
दैनिक स्थैर्य । दि. ०७ जुलै २०२२ । सातारा । जिल्हा दक्षता व नियंत्रण समितीची बैठक जिल्हाधिकारी शेखर सिंह यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयातील परिषद सभागृहात संपन्न झाली.
या बैठकीला अपर पोलीस अधीक्षक अजित बोऱ्हाडे, समाज कल्याणचे सहायक आयुक्त नितीन उबाळे यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी समितीचे सदस्य उपस्थित होते.
या बैठकीत अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती (अत्याचार प्रतिबंधक) अधिनियम 1989 अन्वये पोलीस विभागाकडे दाखल झालेल्या व निपटारा करण्यात आलेल्या प्रकरणांचा आढावा, न्यायालयाकडून निर्णय देण्यात आलेल्या व प्रलंबित असलेल्या प्रकरणांचा आढावा, अर्थसहाय्याची प्रलंबित प्रकरणे या विषयांचा आढावा घेण्यात आला.