दैनिक स्थैर्य । दि. १२ जुलै २०२१ । फलटण । मराठी पत्रकार परिषदेची फलटण शाखा आज सुरु होत असल्याचा आनंद होत अस असून सातारा जिल्हा पत्रकार संघ येथील पत्रकारांच्या पाठीशी खंबीरपणे सदैव उभा असेल, अशी ग्वाही सातारा जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष हरिष पाटणे यांनी दिली.
मराठी पत्रकार परिषदेच्या फलटण तालुका नूतन पदाधिकार्यांच्या सत्काराप्रसंगी आयोजित कार्यक्रमात पाटणे बोलत होते. यावेळी व्यासपीठावर जिल्हा पत्रकार संघाचे प्रसिद्धी प्रमुख दीपक शिंदे, राज्य प्रतिनिधी सुजित आंबेकर, समाधान हेंद्रे, नवनिर्वाचित फलटण तालुकाध्यक्ष रमेश आढाव, बापूराव जगताप उपस्थित होते.
यावेळी फलटण तालुका उपाध्यक्ष युवराज पवार, सचिव विक्रम चोरमले, सहसचिव दिपक मदने, खजिनदार अमोल नाळे, प्रसिद्धीप्रमुख सतीश जंगम, संघटक विजय भिसे यांच्या निवडी जाहीर करण्यात आल्या.
कार्यक्रमास फलटण शहर व तालुक्यातील पत्रकार उपस्थित होते.