
दैनिक स्थैर्य । दि. १२ ऑक्टोबर २०२२ । सातारा । एकात्मिक बाल विकास सेवा योजना, जिल्हा परिषद अंतर्गत बेटी बचाओ-बेटी पढाओ जिल्हास्तरीय टास्क फोर्सची बैठक जिल्हाधिकारी कार्यालयातील परिषद सभागृहात उपजिल्हाधिकारी (महसूल) प्रशांत आवटे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली.
या बैठकीला जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण, जिल्हा परिषदेच्या उप मुख्य कार्यकारी अधिकारी (बाल कल्याण) रोहिणी ढवळे, प्राथमिक शिक्षणाधिकारी शबनम मुजावर, महिला व बाल विकास अधिकारी विजय तावरे, दिशा समितीचे अशासकीय सदस्य विश्वास भोसले यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी, टास्क फोर्सचे सदस्य उपस्थित होते.
सर्व विभागांनी समन्वयाने काम करुन जिल्ह्यामध्ये बेटी बचाओ बेटी पढाओ हे अभियान यशस्वीपणे राबविण्यात यावे. त्याचबरोबर मुलींचा जन्मदर कसा वाढेल यासाठी आरोग्य विभागांनी योग्य ती खबरदारी घ्यावी, अशा सूचना उपजिल्हाधिकारी श्री. आवटे यांनी बैठकीत केल्या.