सोमवारी जिल्हास्तरीय लोकशाही दिन


दैनिक स्थैर्य | दि. २ जून २०२३ | सोलापूर | जनतेच्या तक्रारी, गाऱ्हाणी ऐकण्यासाठी जिल्हास्तरीय लोकशाही दिनाचे सोमवार दिनांक 5 जून 2023 रोजी सकाळी 11.00 वाजता जुने जिल्हाधिकारी कार्यालयातील सेतू हॉलमध्ये आयोजन करण्यात आले असल्याची माहिती निवासी उपजिल्हाधिकारी शमा पवार यांनी दिली.

या लोकशाही दिनात मागील महिन्यातील प्रलंबित निवेदन व अर्ज, माहिती अधिकार अधि.-2005 अंतर्गत प्राप्त अर्ज, आपले सरकार पोर्टलवरील प्रलंबित तक्रारीवर केलेली कार्यवाही याबाबत निपटारा करण्यात येणार आहे. तसेच नागरिकांच्या लोकशाही दिनातील अर्जावरही कार्यवाही करण्यात येणार असल्याची माहिती निवासी उपजिल्हाधिकारी शमा पवार यांनी दिली.


Back to top button
Don`t copy text!