कोविड -१९ मुळे पालक गमावलेल्या बालकांना न्याय हक्क व इतर लाभ देण्याकरीता जिल्हास्तरीय कृती दल समितीची बैठक संपन्न

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य । दि. २० जून २०२२ । सातारा । कोविड -१९ मुळे दोन्ही पालक / एक पालक गमावलेल्या बालकांना तसेच विधवा झालेल्या महिलांना त्यांचे न्याय हक्क व इतर लाभ देण्याकरिता जिल्हास्तरीय गठीत केलेल्या जिल्हास्तरीय कृती दल (टास्क फोर्स) ची बैठक जिल्हाधिकारी शेखर सिंह यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली.

जिल्हाधिकारी कार्यालयातील परिषद सभागृहात झालेल्या या बैठकीला जिल्हा शल्यचिकीत्सक डॉ. सुभाष चव्हाण, जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी व्हि. ए. तावरे, माविमचे जिल्हा समन्वय अधिकारी विजय ढोके, शिक्षणाधिकारी (माध्य.) प्रभावती कोळेकर, समाज कल्याणचे सहाय्यक आयुक्त नितीन उबाळे, कौशल्य विकास सहाय्यक आयुक्त, सुनील पवार, बाल कल्याण समितीच्या अध्यक्षा ॲड.सुचित्रा घोगरे-काटकर व समितीचे इतर सदस्य, टास्कफोर्सचे सदस्य व प्रतिनिधी उपस्थित होते.

यावेळी जिल्हाधिकारी शेखर सिंह म्हणाले, कोविड – 19 मुळे एक किंवा दोन पालक गमावलेल्या बालकांना शैक्षणिक सुविधा मिळण्यासाठी त्वरीत कार्यवाही करावी. अनाथ बालकांच्या वारसा हक्क नोंदी व अन्य लाभ मिळण्यासाठी संबंधित विभागाने कार्यवाही करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी यांनी यावेळी दिले.

अनाथ झालेल्या बालकांना शैक्षणिक व अन्य मदतीसाठी सामाजिक उत्तर दायित्व म्हणून समाजातील दानशूर व्यक्ती, स्वयंसेवी संस्था व सी. एस. आर. कंपन्यांनी पूढे येऊन मदत करण्याचे आवाहन यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी केले.


Back to top button
Don`t copy text!