कोविड-19 मुळे दोन्ही पालक/एक पालक गमावलेल्या बालकांना त्यांचे न्याय हक्क व इतर लाभ देण्याकरीता जिल्हास्तरीय कृती दल समितीची बैठक संपन्न

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

दैनिक स्थैर्य । दि.१४ जानेवारी २०२२ । सातारा । कोविड-19 मुळे दोन्ही पालक/एक पालक गमावलेल्या बालकांना तसेच विधवा झालेल्या महिलांना त्यांचे न्याय हक्क व इतर लाभ देण्याकरीता जिल्हास्तरीय गठीत केलेल्या जिल्हास्तरीय कृती दल (टास्क फोर्स ) ची बैठक जिल्हाधिकारी शेखर सिंह यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली.

जिल्हाधिकारी कार्यालयातील परिषद सभागृहात झालेल्या या बैठकीला  महिला व बाल विकास अधिकारी व्हि.ए. तावरे, जिल्हा परिषदेच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी (बाल कल्याण) रोहिणी ढवळे, शिक्षणाधिकारी प्राथमिक धनंजय चोपडे, चाईल्ड लाईन सातारा,  जिल्हा संरक्षण अधिकारी चेतन भारती, नगर पालिका सातारा, शिक्षणाधिकारी माध्यमिक यांचे प्रतिनिधीसह  कृती समितीचे सदस्य उपस्थित होते.

या बैठकीत सातारा जिल्ह्यातील रस्त्यावरील मुलांचा शोध घेऊन त्यांची माहिती राष्ट्रीय बाल हक्क संरक्षण आयोगामार्फत सर्वोच्च न्यायालयात सादर करावयाची आहे यासाठी पोलीस विभागाची मदत घ्यावी, अशा सूचना जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी केल्या.

सध्या जिल्ह्यात कोविडमुळे दोन्ही पालक गमावलेले एकूण 15 बालके आहेत. नव्याने आढळलेल्या 8 अनाथ बालकांना शासनाने मंजुर केलेल्या पीएम पोर्टलचा लाभ मिळण्यासाठीचा ऑनलाईन प्रक्रिया पूर्ण करुन मुख्य पोस्ट ऑफीसमध्ये संयुक्त खाते उघडण्यात आले आहे याबाबत श्री. तावरे यांनी बैठकीत सांगितले.

कायदेशीर प्रक्रिया करुन 8 बालकांची मालमत्ता त्यांच्या नावावर होण्याची कार्यवाही लवकरात लवकर करा, अशा सूचना जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी केल्या.


Back to top button
Don`t copy text!