जिल्हा माहिती अधिकारी वर्षा पाटोळे यांचा पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या हस्ते गौरव

'१०० दिवसांच्या कार्यालयीन सुधारणा' मोहिमेत उत्कृष्ट कार्याबद्दल प्रशस्तीपत्र देऊन सन्मान


स्थैर्य, सातारा, दि. 17 ऑगस्ट : राज्य शासनाच्या ‘१०० दिवसांच्या कार्यालयीन सुधारणा विशेष मोहिमे’अंतर्गत केलेल्या उत्कृष्ट कार्याबद्दल जिल्हा माहिती अधिकारी वर्षा पाटोळे यांना राज्याचे पर्यटनमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या हस्ते प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात आले. ७९ व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या मुख्य शासकीय ध्वजारोहण समारंभात हा सन्मान करण्यात आला.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निर्देशानुसार राबवण्यात आलेल्या या मोहिमेमध्ये, जिल्हा माहिती अधिकारी या गटातून राज्यस्तरावर सातारा जिल्हा माहिती कार्यालयाने तृतीय क्रमांक पटकावला आहे. या मोहिमेअंतर्गत कार्यालयाने अभिलेख वर्गीकरण, जुन्या साहित्याचे निर्लेखन आणि कार्यालयाचे सुशोभीकरण यावर भर दिला.

याप्रसंगी जिल्हाधिकारी संतोष पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन, पोलीस अधीक्षक तुषार दोशी, अप्पर जिल्हाधिकारी मल्लिकार्जुन माने यांच्यासह जिल्हा माहिती कार्यालयातील कर्मचारी उपस्थित होते.


Back to top button
Don`t copy text!