दैनिक स्थैर्य । दि. २६ मे २०२२ । सातारा । जिल्हा विकास समन्वयक व सनियंत्रण समिती (दिशा) बैठक खासदार श्रीनिवास पाटील यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा परिषदेच्या छत्रपती शिवाजी सभागृहात संपन्न झाली.
या बैठकीला आमदार दिपक चव्हाण, जिल्हाधिकारी शेखर सिंह, मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा, ग्रामीण विकास यंत्रणेच्या प्रकल्प संचालक सुषमा देसाई यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी, समितीचे सदस्य उपस्थित होते.
या बैठकीमध्ये महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजना, स्वच्छ भारत मिशन, राष्ट्रीय पेयजल कार्यक्रम, प्रधान मंत्री फसल विमा योजना, सर्व शिक्षा अभियान यासह विविध योजनांचा आढावा घेण्यात आला.
बचत गटांनी उत्पादित केलेल्या मालाला बाजार पेठ मिळवून देण्यासाठी प्रयत्न करण्यात यावे, अशा सूचना समितीचे अध्यक्ष तथा खासदार श्री. पाटील यांनी व्यक्त केल्या.