प्रशासनाने दिलेल्या नियमांचे पालन करावे जिल्हाधिकारी शेखर सिंह यांचे आवाहन

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य । दि. १६ डिसेंबर २०२१ । सातारा । दक्षिण आफ्रिकामध्ये आढळलेला कोरोनाचा नवीन विषाणू ओमायक्रॉनचा संसर्गाच्या पार्श्वभूमीवर जिल्हादंडाधिकारी सातारा यांनी दिनांक 29 नोव्हेंबर 2021 रोजी आदेश काढून निर्बंध आखून दिलेले आहेत. निर्बंधांचे पालन न करणाऱ्या जिल्ह्यातील 52 व्यक्तींवर कारवाई करुन 12 हजार 800 इतका दंड वसुल करण्यात आला आहे. कोरोना संसर्गाबाबत प्रशासनाने दिलेल्या नियमांचे पालन करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी केले आहे.

सातारा जिल्हयातील शहरी व ग्रामीण भागातील मोठया गांवामध्ये कोरोना नियमांचे पालन होत नसलेचे दिसून येत आहे. जिल्हयातील पोलीस प्रशासन, स्थानिक स्वराज्य संस्था प्रशासन, सर्व उपविभागीय अधिकारी, सर्व तहसीलदार यांना मोठया आस्थापना व गर्दीचे ठिकाणे येथे भेट देऊन जेथे कोरोना नियमांचे उल्लंघन होत असल्याचे निदर्शनास येईल तेथे दंडात्मक कारवाई करण्याच्या सूचना दिलेल्या आहेत.

सातारा जिल्ह्यातील पोलीस प्रशासन, स्थानिक स्वराज्य संस्था प्रशासन यांचेमार्फत दि. 29 नोव्हेंबर ते दि. 14 डिसेंबर 2021 पर्यंत सातारा जिल्हयात विनामास्क फिरणा-या 52 व्यक्तींवर कारवाई करण्यात आली असून सुमारे 12 हजार 800 इतका दंड वसूल करण्यात आलेला आहे.

सातारा जिल्हयातील शहरी व ग्रामीण भागातील स्थानिक प्रशासनाकडून वाहनाव्दारे व्यावसायिक तसेच इतर दुकानदार यांना त्यांचे आस्थापनांमध्ये मास्क घालणे, सामाजिक अंतर, सॅनिटायझरचा वापर करण्याबाबत लाऊडस्पिकरव्दारे सूचना देण्यात आलेल्या आहेत.

नागरिकांनी लसीचे दोन्ही डोस वेळेत घ्यावे

सातारा जिल्ह्यातील सर्व नागरिकांनी शासनामार्फत सुरु असलेल्या कोरोना प्रतिबंधक मोफत लसिकरणाचा लाभ घ्यावा व आपले दोन्ही लसीकरणाचे डोस वेळेत पूर्ण करुन घ्यावेत. सातारा जिल्ह्याकरिता कोरोना संदर्भातीलनवीन नियमावली तयार करण्यात आली आहे. जे कोणी कोविड अनुरुप वर्तनाचे किंवा कार्यपध्दतीचे पालन करणार नाही अशा व्यक्ति, संस्था किंवा आस्थापनांवर दंडात्मक कारवाई करण्यात येईल. नागरिकांनी कोविड नियमांचे पालन करावे, असे आवाहनही श्री. सिंह यांनी केले.


Back to top button
Don`t copy text!