
दैनिक स्थैर्य | दि. 27 जून 2025 | फलटण | श्री संत ज्ञानेश्वर महाराजांचा पालखी सोहळा उद्या फलटणमध्ये मुक्कामी येणार आहे. याच पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी संतोष पाटील व जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी याशिनी नागारजन यांनी फलटण पालखी तळाची पाहणी केली. यावेळी मुख्याधिकारी निखिल मोरे यांनी विविध विभागांच्या समन्वयाने फलटण पालखीतळावर करण्यात आलेल्या सर्व सोयी सुविधांची माहिती दिली.
यावेळी बोलताना जिल्हाधिकारी संतोष पाटील म्हणाले की, वारी मध्ये येणाऱ्या वारकऱ्यांना कोणत्याही सोयीसुविधा कमी पडू देऊ नका. वारकऱ्यांची सेवा करण्यासाठी आपण सर्वजण सज्ज राहू! सर्व शासकीय विभागांनी समन्वय राखत काम करण्याचे आवाहन सुद्धा जिल्हाधिकारी संतोष पाटील यांनी यावेळी केले.
यासोबतच यशवंतराव चव्हाण हायस्कुल येथे उभारण्यात आलेल्या वारकरी सेवा केंद्राची पाहणी करत त्या ठिकाणी विश्रांती घेत असलेल्या वारकऱ्यांशी जिल्हाधिकारी संतोष पाटील व जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी याशिनी नागारजन यांनी संवाद साधला व सोयी सुविधांचा आढावा घेतला.