दोन दिवसात पाचगणी-महाबळेश्‍वर येथील पर्यटन व्यवसाय सुरू करण्याचे जिल्हाधिकार्‍यांचे संकेत

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


 

स्थैर्य, महाबळेश्वर, दि. 6 :  सात महिन्यांपासून पर्यटन व्यवसाय बंद असल्याने आर्थिक संकटात सापडलेल्या व्यावसायिकांना दिलासा देण्यासाठी येत्या दोन दिवसांत पाचगणी-महाबळेश्‍वर येथील पर्यटन व्यवसाय सुरू करण्यास परवानगी देणार असल्याचे संकेत जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी दिले.

पाचगणी टेबललँडवरील पर्यटन व्यवसाय सुरू करण्यास परवानगी मिळावी अशा मागणीचे निवेदन आ. मकरंद पाटील, टेबललँड  व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष सुधाकर बगाडे, उपाध्यक्ष नामदेव चोपडे, माजी नगरसेवक हेन्री जोसेफ, प्रकाश गोळे, रूपेश बगाडे यांनी जिल्हा-धिकार्‍यांना दिले.

शासनाने हॉटेल, लॉज, रेस्टॉरंट आदी व्यवसाय सुरू करण्यासाठी परवानगी दिली आहे. मात्र गेल्या सात महिन्यांपासून बंद असलेला पर्यटन व्यवसाय सुरू करण्यास परवानगी दिली नाही. यामुळे उपासमारीच्या संकटात सापडलेल्या घोडे व्यावसायिकांनी कायदा हातात घेवून व्यवसाय सुरू करणार असल्याचे निवेदन टेबललँड  व्यापारी असोसिएशनने 5 ऑक्टोबर रोजी मुख्याधिकारी गिरीश दापकेकर यांना दिले होते. पर्यटन व्यवसायावर अवलंबून असलेल्या टेबललँड पठारावरील सुमारे 600 लोकांच्या उपजीविकेचा प्रश्‍न निर्माण झाल्याने आ. मकरंद पाटील यांनी आज दुपारी तीन वाजता जिल्हाधिकारी शेखर सिंह यांची भेट घेऊन पर्यटन व्यवसाय सुरू करण्याचा निर्णय घ्यावा असे सांगितले.


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Don`t copy text!