रिपलेक्टर न लावलेल्या वाहनांना जिल्ह्यातील सर्व रस्त्यांवर प्रतिबंध जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांचे आदेश  


दैनिक स्थैर्य । दि. ०२ डिसेंबर २०२२ । सातारा । जिल्ह्यामध्ये सुरु असणाऱ्या ऊस वाहतुकीच्या पार्श्वभूमीवर रिपलेक्टर न लावलेल्या वाहनांना जिल्ह्यातील रस्त्यांबरोबरच साखर कारखान्यांसह सर्व परिसरामध्ये  प्रतिबंधकरणारे आदेश जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांनी दिले आहेत.

क्रिमीनल प्रोसिजर कोड 1973 चे कलम 144 नुसार जिल्हाधिकारी यांना प्राप्त झालेल्या अधिकारान्वये हे आदेश दिले आहेत. तसेच बैलगाडीतून होणारी वाहतूक विना अपघात होण्यासाठी बैलगाड्यांनाही समोरील व मागील बाजुस उच्च प्रतिचे, दिसेल अशा ठिकाणी रिपलेक्टर टेप लावावेत, असेही आदेशात म्हटले आहे.


Back to top button
Don`t copy text!