दैनिक स्थैर्य । दि. १६ जुलै २०२१ । सातारा । सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक आयोजित डिजीग्राम संकल्पने अंतर्गत शाखा परळी येथील नित्रळ येथे मंगळवार, 13 रोजी शिबिर आयोजित करण्यात आले होते. यावेळी प्रमुख उपस्थिती म्हणून नित्रळ वि.का.स.सेवा सोसायटीचे उपाध्यक्ष चंद्रकांत वांगडे (दादा), शिवसह्याद्री पतपेढीचे व्यवस्थापक प्रतापराव वांगडे तसेच नित्रळ येथील सरपंच, सदस्य, वि.का.स.सेवा सोसायटी आध्यक्ष, संचालक, शेतकरी बचत गटातील सदस्य व ग्रामस्थ उपस्थित होते.
यावेळी चंद्रकांत वांगडे (दादा) यांनी जिल्हा बँकेने नित्रळ गावाची डिजीग्राम करिता निवड केल्याबद्दल जिल्हा बँकेचे आभार मानले. शाखा परळी येथे इतर राष्ट्रीयकृत बँके पेक्षा किती आपुलकीने व नम्रपणे जलद सेवा दिली जाते तसेच जिल्हा बँकेची डिजीटल वाटचाल कौतुकास्पद असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. नित्रळ गाव दिलेल्या मुदती अगोदर सर्वांच्या सहकार्याने जिल्हा बँकेच्या डिजिटल सेवा सुविधांयुक्त करणार हा विश्वास व्यक्त केला.
डिजीग्राम शिबिर अनुषंगाने मार्गदर्शन व माहिती देण्याकरिता बँकेच्या वतीने विभागीय विकास अधिकारी, सातारा विभाग श्रीमंत तरडे, शाखा प्रमुख, परळी शाखा विवेक मोरे, सम्राट माने, रियाझ मोकाशी, अजिंक्य कुंभार, सौ. काळे मॅडम, कमलेश मनवे, हे उपस्थित होते.
डिजीग्राम ही संकल्पना काय आहे व ती कशा पध्दतीने राबवायची आहे व बँकेच्या वतीने राबवण्यात येत असणार्या डिजिटल सेवांची माहिती मोरे यांनी दिली. डिजिटल व्यवहारा संदर्भात मार्गदर्शन कुंभार यांनी केले, बँकेच्या विमा योजनांची माहिती सौ. काळे मॅडम यांनी दिली, तरडे यांनी डिजीग्राम संकल्पनेचा हेतू व यामुळे ग्रामस्थांना होणारे फायदे विषद केले.
सुभाष वांगडे यांनी मनोगत व्यक्त करताना, खरोखर आपुलकीने व जिव्हाळ्याने सेवा देणारी बँक म्हणजे सातारा जिल्हा मध्यवर्ती बँक आहे, असे नमुद केले व अलीकडील काळात 84 हजार व्यवहार हे डिजिटल स्वरुपात होत असुन उर्वरित 16 हजार लोकांपर्यंत ही डिजिटल सेवा देण्याचे काम आज सातारा जिल्हा मध्यवर्ती बँक करत आहे, ग्राहकांच्या आवश्यक सेवांची नस ओळखल्या मुळेच आज सातारा जिल्हा मध्यवर्ती बँक प्रगतीच्या शिखरावर असल्याचे नमुद केले.
शिबिर संपन्न झाले नंतर उपस्थित मान्यवर व अधिकारी यांचे हस्ते हरिश्चंद्र निपाने यांना एटिएम कार्ड वितरीत करून मोबाईल एटिएम व्हॅन मध्ये ते ऍक्टिव्ह करण्याची माहिती देण्यात आली. तसेच आज शाखा परळी अंतर्गत प्रतुल राऊत या हॉटेल व्यावसायिकास क्यूआर कोड वाटप करण्यात आले.