शेतकरी हितासाठी जिल्हा बँकेचे एक पाऊल पुढे : चव्हाण
माधव देशमुख, बबन देशमुख यांना ट्रॅक्टरच्या चाव्या प्रदान करताना सुनील चव्हाण, शांताराम पवार व मान्यवर.(छाया : समीर तांबोळी)
स्थैर्य, कातरखटाव, दि. ३० : शासनाच्या विविध योजना थेट शेतकऱ्यांपर्यंत पोहचविण्या बरोबरच बळीराजाला केंद्र स्थानी ठेवत त्यांना सक्षम करण्यासाठी जिल्हा बँके नेहमीच एक पाऊल पुढे असते असे प्रतिपादन विभागीय विकास अधिकारी सुनील चव्हाण यांनी केले.
सिद्धेश्वर कुरोली (ता.खटाव ) येथील विकास सोसायटीच्या वतीने ट्रॅक्टर, ट्रेलर व औजारे वितरण प्रसंगी ते बोलत होते. यावेळी विकास अधिकारी शांताराम पवार,शाखाप्रमुख आर व्ही कर्णे यांची प्रमुख उपस्थिती होती.
चव्हाण म्हणाले की, जिल्हा बँकेने शेतकरी हिताला प्राधान्य देत आजपर्यंत अनेक योजनांची प्रभावीपणे अंमलबजावणी केली असून याचे फलित म्हणून बँकेला सहकारातील सर्वोच्च असणारा नाबार्डचा सातवेला पुरस्कार मिळाला आहे. शेतकऱ्यांनीही बँक व सोसायटीच्या माध्यमातून घेतलेल्या कर्जाची वेळेत परतफेड करून सहकार्य करावे.व आपली पत निर्माण करावी व सहकाराच्या माध्यमातून समृद्ध व्हावे असे ही चव्हाण यांनी सांगितले.
यावेळी संस्थेचे अध्यक्ष बापूसाहेब देशमुख,एस.पी देशमुख, राजेंद्र देशमुख, गजानन देशमुख, अनुज देशमुख, प्रताप ढगे, सुधीर देशमुख, अंकुश पंडोळे, सत्यजित डूडडू, विनायक देशमुख, सुनील देशमुख, किसन जगदाळे, राजेंद्र देशमुख, बबन देशमुख, विठ्ठल देशमुख, अनिल देशमुख, अनिल जगदाळे उपस्थित होते. सचिव वैभव उर्फ बंडा देशमुख यांनी आभार मानले.