स्थैर्य, औंध, दि. ०७: औंध येथील राजयोग दूध संकलन केंद्रास जिल्हा कृषी अधिकारी गुरुदत्त काळे यांनी सदिच्छा भेट दिली. यावेळी राजयोग फाऊंडेशन शेतकऱ्यांसाठी राबवत असलेल्या विविध उपक्रमांची त्यांनी माहिती घेतली व समाधान व्यक्त केले.
शेतीपूरक व्यवसायांपैकी दुग्ध व्यवसाय हा शेतकऱ्याच्या समृद्धीचा यशस्वी मार्ग आहे. याअगोदर कंपनी मार्फत शेतकऱ्यांनी संघटित होऊन सोयाबीन खरेदी – विक्री केली, ज्यातून शेतकऱ्याला त्याच्या उत्पादनाला व्यापाऱ्यांपेक्षा जास्तीचा भाव मिळाला. अशाच स्वरूपाच्या उपक्रमातून शेतकऱ्याचा आर्थिक स्तर उंचावून शेतकरी आर्थिक दृष्ट्या सक्षम व्हावा, हे उद्दिष्ट बाळगून राजयोगकृषी शेतकरी उत्पादक कंपनी अमर देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली यशस्वी मार्गक्रमण करीत आहे अशी माहिती यावेळी तानाजी इंगळे व प्रशांत जाधव यांनी जिल्हा कूषी अधिकारी काळे यांना दिली. राजयोग फाऊंडेशन व दुग्ध फर्मच्या माध्यमातून अनेक शेतकरी उपयोग प्रकल्प उद्योजक अमर देशमुख यांच्या नेतृत्वाखाली उभारण्यात येणार आहेत अशी माहिती हि प्रशांत जाधव यांनी दिली. अमर देशमुख ग्रामीण भागात करत असलेल्या कामाबद्दल गुरूदत्त काळे यांनी यावेळी गौरवोदगार काढले.
याप्रसंगी सामाजिक कार्यकर्ते दत्तात्रय जगदाळे, तालुका कृषी अधिकारी राहूल जितकर भुजबळ, कृषी मंडल अधिकारी अक्षय सावंत, कृषी पर्यवेक्षक मोहन मदने ,उत्तम तिकोटे कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी तानाजी इंगळे, व्यवस्थापकीय संचालक प्रशांत जाधव, प्रशांत इंगळे ,शेतकरी, ग्रामस्थ मान्यवर उपस्थित होते.