
दैनिक स्थैर्य । दि.२४ जानेवारी २०२२ । सातारा । प्रजासत्ताक दिन कार्यक्रमात प्लास्टीक व कागदी राष्ट्रध्वजांचा वापर थांबविण्यासाठी व योग्य मान राखण्यासाठी कार्यक्रम झाल्यानंतर खराब झालेले राष्ट्रध्वज तहसिल आणि जिल्हा स्तरावरील यंत्रणेस सुपूर्द करण्यात यावेत. हे राष्ट्रध्वज सुपूर्द करण्याची जबाबदारी संबंधित कार्यक्रम आयोजित करणाऱ्या संस्थांवर असेल, अशी माहिती जिल्हा प्रशासनाने दिली आहे.
राष्ट्रध्वजाचा योग्य मान राखणे आणि अवमान होऊ न देण्यासाठी जागरुक राहणे हे प्रत्येक नागरिकाचे कर्तव्य आहे. प्रजासत्ताक दिन, स्वातंत्र्य दिन, महाराष्ट्र दिन व इतर राष्ट्रीय कार्यक्रम, महत्वाचे सांस्कृतिक व क्रीडा सामन्यांच्यावेळी कार्यक्रम पार पडल्यानंतर खराब झालेले, माती लागलेले, मैदानात-रस्त्यावर तसेच कार्यक्रमाच्या ठिकाणी इतस्तत: पडलेले राष्ट्रध्वज गोळा करुन संबंधित यंत्रणांकडे जमा करावेत.