दैनिक स्थैर्य । दि. २१ ऑगस्ट २०२२ । फलटण । धुमाळवाडी ता. फलटण जि. सातारा येथे कै. मालन टाळकुटे यांच्या प्रथम स्मरणार्थ टाळकुटे परिवाराकडून धुमाळवाडी येथील शेतकऱ्यांना फळझाडे वाटप कार्यकम संपन्न झाला.
यावेळी ॲड. विश्वनाथ टाळकुटे यांनी आपल्या आई कै. मालन टाळकुटे यांच्या प्रथम स्मरणार्थ निसर्गाचे आणि समाजचे आपण काही तरी देणं अहोत या भावनेतून धुमाळवाडी ता. फलटण जि. सातारा या गावातील शेतकऱ्यांना प्रति शेतकरी एक नारळ व आंबा कलमे फळझाडे प्रमाणे असे 200 शेतकऱ्यांना वाटप करण्यामागे उद्देश सांगितले. तसेच अॅड. विश्वनाथ टाळकुटे यांच्या हस्ते शेतकऱयांना फळझाडे वाटप करण्यात आले.
“सहवास जरी तुटला स्मृती सुंगध देत राहतील आयुष्यच्या प्रत्येक वळणावर आई तुझी आठवण येत राहतील”
पर्यावरण व निसर्गाचा समतोल राखण्यासाठी व कुटुंबातील फळाची गरज भागवणे आणि नैसर्गीक साधन संपत्ती मध्ये भर पाडण्यासाठी चा एक संदेश व एक आदर्श ठरेल आहे.
त्यामुळे एक वेगळा आदर्श घेऊन विश्वनाथ टाळकुटे हायकोर्ट मुंबई यांनी धुमाळवाडी येथील शेतकऱ्यांना फळझाडे वाटप करून फलटण तालुक्यात आदर्श असा उपक्रम केला आहे. “झाडे लावा झाडे जगवा”-जिल्हा परिष संत तुकाराम महाराज यांच्या अभंग नुसार “वृक्ष वल्ली आम्हा सोयरे वन चरी” अॅड. विश्वनाथ टाळकुटे यांनी आपल्या आई कै. मालन टाळकुटे यांच्या प्रथम स्मरणार्थ शेतकऱ्यांना फळझाडे वाटप उपक्रम एक आदर्श ठरेल. यावेळी कृषि सहाय्यक सचिन जाधव यांनी कृषि विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमा बाबत शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पीव्ही पवार सर यांनी केले.
यावेळी माजी सरपंच योगेश कदम, ग्रामपंचायत सदस्य समीर पवार, राजराम पवार, शेतकरी रिसोर्स बैंक सदस्य नितीन पवार, कृषि मित्र तुषार धुमाळ, शेतकरी उत्पादक कंपनी सदस्य शरद पवार, धुमाळवाडी शाळा शिक्षण कमिटी अध्यक्ष सुनील भोसले, डॉ. गणेश शिंदे, तात्या गायकवाड, प्रशांत धनवडे, पराग नलगीडे, राहुल टाळकुटे, प्रगतशील शेतकरी महेश धुमाळ, नीलकंठ धुमाळ, अनिल गुंजवटे, चबुताई धुमाळ महिला व शेतकरी मोठया प्रमाणे उपस्थित होते.