दैनिक स्थैर्य । दि. २४ जून २०२३ । यवतमाळ । जिल्हा वार्षिक आदिवासी उपयोजना बाह्य क्षेत्रातील आदिवासी लाभार्थ्यांना जिल्हा वार्षिक आदिवासी उपयोजनांतर्गत पारधी विकास योजनेतून तसेच नाविण्यपूर्ण योजनेतून विविध वस्तूंचे व धनादेशाचे वाटप अन्न व औषध प्रशासन मंत्री तथा पालकमंत्री संजय राठोड यांच्या हस्ते नेर येथील शासकीय विश्रामगृहात करण्यात आले.
घरी विदयुत व्यवस्था नसणा-या अजंती पारधी बेडयावरील पारधी लाभार्थ्यांना सौर कंदिलाचे वाटप करण्यात आले. तसेच झोंबाडी पारधी बेडयावरील २ पारधी लाभार्थ्यांना दुधाळ जनावरांचे प्रत्येकी ९० हजार रुपयांचे धनादेशाचे वाटप करण्यात आले. कोलाम याआदिम जमातीतील लाभार्थ्यांना सकस आहार व ताजा भाजीपाला मिळण्याच्या उद्देशाने नाविन्यपूर्ण योजनेतून महाबीज परसबाग भाजीपाला बियाणे किटचे वितरण नेर तालुक्यातील उत्तरवाढोणा व कामनदेव येथील लाभार्थ्यांना करण्यात आले. सदरची योजना प्रकल्प अधिकारी, एकात्मिकआदिवासी विकास प्रकल्प, पुसद जि.यवतमाळ यांचे मार्फत राबविण्यात आली असुन आदिवासी लाभार्थ्यांनी प्रकल्प कार्यालयाच्या विविध योजनांचा लाभ घ्यावा व आपले जीवनमान उंचवावे असे आवाहन मंत्री संजय राठोड यांनी केले.