दैनिक स्थैर्य | दि. १५ ऑगस्ट २०२४ | फलटण |
‘वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरे’ या उक्तीप्रमाणे वसुंधरा संवर्धन अभियानांंतर्गत सातत्याने कापशी ग्रामपंचायत पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी विविध उपक्रम राबवत आहे. आता ग्रामपंचायतीने प्रत्येक कुटुंबाला २ दोन वृक्ष देण्याचा संकल्प करून केशर जातीचा आंबा व इतर चिंच, करंज, पिंपळ वड, लिंब अशा वृक्षरोपांच्या वाटपाचा कार्यक्रम स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने आज ग्रामपंचायत कापशी येथे संपन्न झाला.
यावेळी ग्रामपंचायत कापशीतर्फे महिला व ग्रामस्थांना अभियानात सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले.
कार्यक्रमास सरपंच सौ. पूनम राशिनकर, ग्रामपंचायत सदस्य गौरी जाधव., मैना काकडे, रवींद्र कदम, संजय गारडे, पोलीस पाटील नितीन जाधव, निष्ठा ग्राम संघाच्या सरिता कदम, सुप्रिया काकडे, अरुणा कुदळे तसेच सोसायटी सदस्य, ज्येष्ठ नागरिक व सर्व बचत गटातील महिला व युवक वर्ग उपस्थित होता.
ग्रामपंचायतीने एकूण १००० वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट ठेवले आहे.